Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

चिमगाव (ता कागल) येथे 1 कोटी 9 लाख रू.च्या विकासकामांचा शुभारंभ.

 चिमगाव (ता कागल) येथे 1 कोटी 9 लाख रू.च्या विकासकामांचा शुभारंभ.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड  प्रतिनिधी

 जोतीराम कुंभार

---------------------------------

शाश्वत विकासकामांना प्राधान्य देणार ; राजे समरजितसिंह घाटगे.


    गेल्या पंचवीस वर्षांपासून सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडित शाळा दुरुस्ती,अंगणवाडी, वीज, आरोग्य केंद्र याबाबतीत भरीव शाश्वत विकासाची कामे झालीच नाहीत. मात्र छत्रपती शाहू महाराज आणि स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांची दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून सामाजिक स्तर उंचाविण्यासाठी आमच्याकडे कोणतेही संविधानिक पद नसतानाही आशा शाश्वत विकासकामांना प्राधान्य देत आहोत असे प्रतिपादन भाजपचे नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. 

    चिमगाव ( ता.कागल) येथे राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या 1 कोटी 9 लाख रु. विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

        यामध्ये गावातील प्रामुख्याने श्री.चिमकाईदेवी मंदिर सुशोभीकरणासाठी 1 कोटी रु. गैबी चौक डोंगरी विकास अंतर्गत कामांसाठी 5 लाख रु.,सोलर हायमास्ट दिव्यांसाठी 2 लाख 50 हजार रु. , ग्रा. पं. संलग्न सौर प्रकल्पासाठी 1 लाख 30 हजार रु. आदी कामांचा समावेश आहे. यावेळी गावाला भरीव निधी दिल्याबद्दल राजे समरजीतसिंह घाटगे यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने सरपंच,उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य यांच्या वतीने करण्यात आला.

       यावेळी श्री.घाटगे बोलताना म्हणाले, लोकप्रतिनिधी आपल्या दारी, जातीचे दाखले देण्याचे कॅंम्प आदी समाजाला उभारी देणारे उपक्रम मतदारसंघात राबविलेच नाहीत.याबाबत खंत व्यक्त करत आम्ही करत असलेल्या या विधायक कामांचा आमचा लेखाजोखा नेहमीच आम्ही माध्यमांच्या माध्यमातून देत आहोत.त्यामुळे आम्ही करत असलेल्या या शाश्वत विकासकामांच्या जोरावरच येत्या काळात परिवर्तन करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा असे आवाहनही श्री.घाटगे यांनी यावेळी केले.

     हमिदवाडा कारखान्याचे माजी संचालक नारायण मुसळे, सरपंच दीपक आंगज यांनी मनोगत व्यक्त केले.

       यावेळी बिद्रीचे माजी संचालक दत्तामामा खराडे,भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय चौगुले,ग्रा.पं. सदस्य सर्जेराव अवघडे,सागर भोई ,संजय एकल, कविता करडे, संगीता फराकटे, अस्मिता चौगले,रेश्मा गुरव, सुलोचना कांबळे, स्वप्नाली एकल,ग्रामसेवक बाबुराव साठे,रोहितकाका कुलकर्णी,बाळू आंगज,निवृत्ती करडे, भरत जाधव यांच्यासह ग्रामस्थ,कार्यकर्ते,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       स्वागत उपसरपंच आनंदा चौगले यांनी केले. आभार ग्रा.पं सदस्य आनंदा करडे यांनी मानले.


   1) चिमगाव (ता. कागल) येथील श्री.चिमकाईदेवी मंदिराच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करताना राजे समरजीतसिंह घाटगे सोबत इतर मान्यवर....

Post a Comment

0 Comments