भुईंज पोलिसांनी 104575/ रुपये चोरीचा बनावं करून दिशाभूल करणाऱ्या चार जणांना अटक केले.

 भुईंज पोलिसांनी 104575/ रुपये चोरीचा बनावं करून दिशाभूल करणाऱ्या चार जणांना अटक केले.


-----------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

अमर इंदलकर

-----------------------------------------

 रात्री ९ वा. चे सुमारास फिर्यादी आकाश दिलीप बोडके, वय 21 वर्ष हा महागाव ता.जि. सातारा त्यांचे साथीदार राहुल अंकुश गोळे, वय 26 वर्ष रा. जानकर कॉलनी मंगळवार पेठ सातारा, व मयूर आनंदराव कीर्दत. रा.करंजे सातारा.यांचे सोबत मेडिकल औषधाच्या बॉक्सची विक्री करून मिळालेले रु.१०४५७५/ रुपये.एका ग्रे रंगाच्या बॅगमधून त्यांचे साथीदार यांचे मालकीचा टेम्पो महिंद्रा सुप्रो एम एच 11 सी एच 9375 मधून वाई ते पाचवड मार्गे जात असताना मौजे आसले (कुंभारवाडी) ता. वाई गावचे हद्दीत आल्यानंतर फिर्यादी आकाश बोडके यांच्या गाडीतील साथीदार टॉयलेटला लागलेला तसेच दारूच्या दुकानातून विकत घेतलेली दारू पिण्यासाठी टेम्पो रोडच्या कडेला उभा करून लॉक केला व ते बाजूच्या शेतात गेले. थोड्या वेळाने ते तिघेही परत आले असता त्यांना टेम्पोची डाव्या बाजूची काच फुटलेली दिसली व टेम्पोतील पैशाची बॅग चोरी झाल्याचे लक्षात आले. त्याप्रमाणे भुईंज पोलीस ठाण्यात कलम 379 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

      सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने स.पो. नि श्री. रमेश गर्जे यांनी स्टाफ सह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता फिर्यादी व त्याचे साथीदार यांच्याकडे सदर घटने प्रकाराबाबत सखोल चौकशी केली असता त्यांच्या चौकशीत काही संशयास्पद गोष्ट आढळून आल्या म्हणून त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केले असता फिर्यादी सोबत असलेले त्यांचे साथीदार राहुल अंकुश गोळे व मयूर आनंदराव कीर्दत त्यांनी त्यांचे सातारा येथील इतर दोन साथीदार यांचे सोबत संगणमत करून गुन्ह्याचा कट रचून फिर्यादीला शेतामध्ये पुढे पाठवून पाठीमागे सदर पैशाची बॅग त्यांच्या साथीदाराकडे देऊन गाडीची काच फोडून चोरीचा बनाव केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सातारा येथील त्यांची साथीदार यांना देखील लगेच ताब्यात घेऊन चारही आरोपींना गुन्ह्यात अटक करून त्यांची मा. न्यायालयाकडून २ दिवस पोलीस कोठडी घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्य़ातील चोरीस गेलेली १ लाख ४ हजार ५७५ रुपये रोख रक्कम असलेली बॅग हस्तगत करण्यात आलेली आहे.

      सदरची कारवाई श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा. श्रीमती आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा. श्री. बाळासाहेब मालगीम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि रमेश गर्जे, पोउनि विशाल भंडारे, पो.हवा. नितीन जाधव, पो.हवा. राजाराम माने, सुहास कांबळे, पो.ना सुशांत धुमाळ, पो.काॅ. रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निंबाळकर यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.