Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कराड येथे दोन युवकांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा 65,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.

 कराड येथे दोन युवकांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा 65,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कराड प्रतिनिधी

वैभव शिंदे 

------------------------------------

  कराड दिनांक 16/12/2023 रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, कराड शहरातील कन्याशाळेचे परिसरात दोन इसम नावे १) किरण दगडू यमकर वय २३वर्षे रा. सोमवार पेठ कराड ता कराड जि सातारा २) ऋतेष धर्मेंद्रे माने वय २१ वर्षे रा वाखाण रोड कराड ता. कराड जि सातारा त्यांचे ताब्यात बेकायदेशीर अग्निशस्त्र घेऊन फिरत आहेत. अशी माहिती मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांचे पथकास देऊन त्यांना नमूद इसमांना ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. नमूद तपास पथकाने कन्याशाळा परिसर कराड ता.कराड जि. सातारा येथे जावून सापळा लावून बातमीमधील दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता एका इसमाच्या ताब्यात एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे एकूण 65,600 /- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदरचे देशी बनावटीचे पिस्टल हे अभिलेखावरील आरोपी प्रद्युमन सोळवंडे रा. बुधवार पेठ कराड याचे असल्याचे त्याने सदरचे देशी बनावटीचे पिस्टल त्यांच्याकडे दिले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुद्ध कराड शहर पोलीस ठाणे गुरनं 1297/2023 भारतीय हत्यार अधिनियम कलम 3(1),25 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

           माहे नोव्हेंबर 2022 पासून आतापर्यंत एकूण 69 देशी बनावटीची/पिस्टल कट्टे व 181 काढतुसे व 377 रिकाम्या पुंगळ्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

      श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा व श्रीमती आंचल दलाल अपर पोलीस अधिक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र मोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार विश्वनाथ सपकाळ, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद येवले, लैलेश फडतरे लक्ष्मण जगधने, सचिन साळुंखे, प्रवीण फडतरे, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, राजू कांबळे, स्वप्नील कुंभार, अमित झेंडे, अजय जाधव, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, मोहन पवार, अरुण पाटील, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाने, पृथ्वीराज जाधव, मयूर देशमुख, संकेत निकम, प्रवीण पवार, मोहसिन मोमीन, आधिका वीर, शिवाजी गुरव, पंकज येसके, अमृत कर्पे, संभाजी साळुंखे, विजय निकम यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा व श्रीमती आंचल दलाल अपर पोलीस अधिक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments