चंदगडच्या शिक्षण क्षेत्राचे होकायंत्र म्हणजे र भा.माडखोलकर संजय साबळे.
चंदगडच्या शिक्षण क्षेत्राचे होकायंत्र म्हणजे र भा.माडखोलकर संजय साबळे.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
चंदगड प्रतिनिधी
आशिष पाटील
-------------------------------
"तपस्या प्रापत्ये यशः हे ब्रिद करून स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारी खेडूत शिक्षण संस्था.स्वातंत्र्यादेखील चंदगड हा अतिशय दुर्गम व डोंगराळ भाग म्हणून ओळखला जायचा. ना ही गावांगावाना जोडणारे रस्ते नाही वाहतुकीची साधने कोणत्याही भौतिक सुविधा नसलेला भाग म्हणजे चंदगड. सरकारी अधिकारी सुद्धा . या भागात यायला घाबरायचे. जिथे शाहू महाराजाची शैक्षणिक चळवळ पोहचू शकली नाही की कर्मवीर भाऊरावांची शैक्षणिक तळमळ पोहचू शकली नाही . समाज अंधारात बुडालेला. हाताच्या बोटावर मोजण्याइतके ज्यांची परिस्थिती बरी आहे असे लोक आपल्या मुलांना बेळगावला शिकायला पाठवत.
अशा परिस्थितीत चंदगडच्या शैक्षणिक क्षितीजावर एक प्रकाश तारा चमकताना दिसला तो म्हणजे र. भा. माडखोलकर सर.
माडखोलकर सर म्हणजे नाविण्याचा ध्यास, माडखोलकर सर म्हणजे त्याग, माडखोलकर सर म्हणजे गोरगरीबांच्या शिक्षणासाठी वाहणारी निरंतर गंगा, माडखोलकर सर म्हणजे चैत्यण्याचा झरा, माडखोलकर सर म्हणजे चंदगडच्या शिक्षण क्षेत्रातील पितामह.
धडपडणारा मुख्याद्यापक, जिव्हाळ्याचा सहयोगी, झपाटलेला कर्मयोगी अशी विशेषणे सरांच्या व्यक्तीमत्वाचे पैलू उलगडून .दाखवतात. घरच्या अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमूळे सामान्य माणसाबाबतच्या संवेदनेचे बाळकडू लाभलेले माडखोलकर सर म्हणजे जीवनभर तेवत राहिलेला नंदादीप होय. " असे प्रतिपादन संजय साबळे यांनी केले.
खेडूत शिक्षण मंडळाचे संस्थापक सदस्य, संकल्पक, माजी चेअरमन कै. र. भा. माडखोलकर यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनि. कॉलेज चंदगड येथील कार्यक्रमात श्री. साबळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एन.डी. देवळे होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला कै. र. भा. माडखोलकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ अध्यापक टी. एस. चांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक बी.आर.चिगरे यांनी केले.
श्री. साबळे पुढे म्हणाले,
" माडखोलकर सर म्हणजे सकसतेच्या मानसिकतेवर सकारात्मकतेचे बीज पेरून आयुष्य बहरून टाकणारे खरे जादूगार होते. ते अनेकांच्या अंधारवाटेवरचे मार्गदर्शक वाटसरू होते. "
कार्यक्रमाला प्रा.एस.ए. निळकंठ, प्रा.ए.एस. धायगुडे, जे.जी. पाटील, एम.व्ही. कानूरकर,डी.जी. पाटील, शरद हदगल, पुष्पा सुतार, विद्या डोंगरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. टी. बेरडे तर आभार सूरज तुपारे यांनी मानले.
Comments
Post a Comment