Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कॉलेज कुमारीने वाढदिवस साजरा केला विटभट्टी मजुरांसमवेत.

 कॉलेज कुमारीने वाढदिवस साजरा केला विटभट्टी मजुरांसमवेत.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

पंढरपूर प्रतिनिधी 

संतोष मोरे 

-----------------------------------

पुजा नवगिरे हिने गोड खाऊसह , शालेय साहित्यासह केले साडीचे वाटप आपले कॉलेज शिक्षण घेत असताना आपला दरवर्षीचा वाढदिवस जल्लोषात साजरा न करता वंचित घटकासोबत साजरा करण्याचा आनंद लुटत यंदाचा २१ वा वाढदिवसही चक्क वीटभट्टी कामगार आणि त्यांच्या मुलासमवेत साजरा केला आहे. सदरची कॉलेज कुमारी मुलगी ही पंढरपूर तालुक्यातील जळोली गावची रहिवासी आहे. ती सध्या पुणे येथे स्पर्धा परीक्षासाठी प्रयत्न करीत आहे.

       सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी महिला सेलच्या उपाध्यक्षा सविता संजय ननवरे यांची पूजा नवगिरे ही कन्या आहे. आजवर या मुलीने आपला वाढदिवस वेगवेगळ्या वंचित घटकासोबत साजरा करीत आनंद मिळविला आहे.

   मागील दोन दिवसापूर्वी आपला २१ वा वाढदिवस जळोली जवळच असलेल्या करकंब येथील राजू शिंदे यांच्या वीटभट्टी वरील गोरगरीब मजूर आणि त्यांच्या चिमुकल्या सोबत साजरा केला. यामध्ये आपल्या वाढदिवसानिमित्त गोड खाऊ, मुलांना शालेय साहित्य आणि महिला मजुरांना साडी वाटप केले.

   यावेळी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या सविताताई नवगिरे, करकंब आर पी आय अध्यक्ष राजू शिंदे यांचेसह अनेकजण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments