Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विविध मागण्यासाठी गोभणी येथील युवकांचे उपोषण !

 विविध मागण्यासाठी गोभणी येथील युवकांचे उपोषण ! 

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

रिसोड प्रतिनिधी

रणजित ठाकुर 

-------------------------------------

 वंचित बहुजन आघाडीचा उपोषण धारकास जाहीर पाठिंबा* गोभणी तालुका रिसोड येथे सतिष देशमुख हे काही प्रमुख मागण्या साठी आमरण उपोषणाला बसले आहेत त्यामध्ये १)शेतामाला सोयाबीन ला ८ ते १० हजार प्रती क्विंटल भाव मिळावा                        २) कापसाला १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा ३) रिसोड करडा गोभणी वडजी जो रस्ता खडयात  आहे त्याचे नवनीकरण करावे अश्या प्रमुख मागण्या घेऊन उपोषणास बसले आहेत, आज या उपोषणाला ४दिवस झाले तरि अद्याप पर्यंत कोणताही सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी उपोषण स्थळी आला नाही किंवा इतर पदाधिकारी सुद्धा कोणी आले नाही यावरून शासनाला सामान्य जनते प्रती काय काळजी आहे हे दिसून येते. म्हणून आज गोभणी येथील‌ उपोषण स्थळी वंचित बहुजन आघाडी तालुका व सर्कल पदाधिकारी यांनी भेट दिली यामध्ये प्रामुख्याने  संतोष साबळे तालुका सचिव वंचित बहुजन आघाडी रिसोड तालुका, रंजित विश्वनाथ साबळे सदस्य ग्राम पंचायत भापुर तथा तालुका कार्यकारिणी सदस्य वंचित बहुजन आघाडी रिसोड तालुका, जेष्ठ मार्गदर्शक कडुजी साबळे सर, अंकुश भाऊ टोंचर सर्कल अध्यक्ष गोभणी, राजेश पातळे , योगेश हुले सदस्य ग्राम पंचायत गोभणी  यांनी  या उपोषणास वंचित बहुजन आघाडी गोभणी सर्कल च्या वतीने जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर केले. जर शासनाने किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम यांनी लवकरात लवकर या उपोषणाची दखल घेऊन योग्य तो मार्ग काढला नाही तर वंचित बहुजन आघाडी गोभणी सर्कल च्या वतीने अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी दिला.यावेळी आकाश साबळे,राहुल हुले, हरिभाऊ अढाव, संजय साबळे, शेख अगाभाई शेख नबी, फारुक भाई, प्रकाश साबळे, देवानंद राऊत,रुपेश हुले, रामेश्वर हुले, आदित्य साबळे, दिलीप हुले,गजानन हुले, पंजाब साबळे, परमेश्वर अंभोरे, गजानन हुले, कृष्णा टोंचर यासह बहुसंख्य वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते . 

Post a Comment

0 Comments