नाथ जोगी समाजाला वाढीव वस्ती गावठाण मंजूर करा.
नाथ जोगी समाजाला वाढीव वस्ती गावठाण मंजूर करा.
--------------------------------------फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
--------------------------------------
गणेशपुर ग्रा .पं. ची निवेदनाद्वारे मागणी/.
गणेशपुर येथील नाथ जोगी समाजाला वाढीवस्ती गावठाण मंजूर करा मागणी गणेशपुर ग्रामपंचायत ने तहसीलदार रिसोड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, गणेशपुर येथील नाथ जोगी समाजांना वाढीवस्ती गावठाण मंजूर करण्याबाबत 14 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामसभा घेण्यात आली गणेशपुर येथे तीनशे ते साडेतीनशे लोकसंख्या आहे त्यात भटक्या विमुक्त नाथ जोगी समाजाची साठ ते सत्तर कुटुंबे राहतात त्यांच्या राहण्याच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे गणेशपुर येथे गावाला लागून जागा उपलब्ध असून ती जागा गावठाण अंतर्गत प्लॉटिंग पाडून त्यांना देण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत ने ठराव घेतला त्या ठरावानुसार 22 डिसेंबर रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी ,गट विकास अधिकारी ,यांनाही देण्यात आल्या आहेत .यावेळी सरपंच प्रतिनिधी विष्णू जाधव, विजय मुटकुळे ,सुनील शेगर, बाजीराव सोळंके, माणिक सोळंके ,भीमराव सुरेश सावंत, लक्ष्मण शेगर, भरत शेगर ,किसन शेगर ,विश्वनाथ शितुळे, राजाराम शितुळे ,रामेश्वर शिंदे , शिवा शेगर, भगवान शेगर, सुभाबाई शितुळे, गुंफाबाई शिंदे, प्रल्हाद खडसे, अशोक भोपाळे ,विजय ताकतोडे, शंकर भोसले, दत्ता शेगर, यांच्यासह नाथ जोगी समाजाची नागरिक मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment