Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कोवाड महाविद्यालयात ग्रीन क्लबचे उद्घाटन.

 कोवाड महाविद्यालयात ग्रीन क्लबचे उद्घाटन.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

चंदगड प्रतिनिधी

आशिष पाटील

-----------------------------

कोवाड : येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात्  ग्रीन क्लब चे उद्घाटन प्राचार्य डॉ. एम.एस.पवार यांच्या हस्ते पार  पडले . पर्यावरण आणि मनुष्य यांच्या  हितासाठी ग्रीन क्लब ची निर्मिती करण्यात आली आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एम.एस.पवार या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.

यावेळी महाविद्यालयातील डॉ. व्ही. आर पाटील प्रा. एस. जे. पाटील सायन्स विभागातील सर्व प्राद्यापक आणि प्रशासकिय, सेवक व विद्यार्थी उपस्थीत होते. या क्लबमार्फत ग्लोबल वार्मिग; पर्यावरण संवर्धन, पक्षी, निसर्गाचे होणारे नुकसान टाळणेसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करणे. तसेच पर्यावरण पूरक व्याखाने, शिबीर, सहल, कंपनी व्हिजिट,कारखाना भेट अशा  विविध कार्यक्रम आयोजित करून पर्यावरण संरक्षण कक्ष निर्माण केल आहे.


या ग्रीन क्लबचे समन्वयक प्रा. चेतन कणसे   विद्यार्थी समन्वयक कू. अनुराधा श्रीखंडे म्हणून कामकाज पाहतील  ग्रीन क्लब सदस्य प्रा. पवन कोकितकर , विद्यार्थी कू. सानिका पाटील, सोनाली रावजिची, पौर्णिमा पाटील यांनी केलं. स्वागत व प्रास्ताविक प्रा. चेतन कणसे यांनी केले. तर आभार प्रा. पवन कोकीतकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments