Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वाई मध्ये ओबीसी समाज बांधवांचा एल्गार मेळावा सपंन्न.

 वाई मध्ये ओबीसी समाज बांधवांचा एल्गार मेळावा सपंन्न.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मेढा :प्रतिनिधी 

प्रमोद पंडीत

-----------------------------------

 संविधानाने आम्हाला दिलेले आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी दिलेले आहे . आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही हजारो वर्षाच्या सामाजिक मागसालेपणा दुर करण्यासाठी ते आहे . सरकारच्या छत्रछायेखाली खोटे कुणबी दाखाले देऊन मागच्या दाराने आमच्या आरक्षणात हे वाटेकरी होऊ पाहतात . आमचा तुमचा आरक्षणाला विरोध नाही , परंतु ते OBC मधून आम्ही देऊ देणार नाही असे मागासवर्ग आयोगाचे माजी संचालक प्रा. लक्ष्मण हाके यांनी येथे सागिताले . वाई , खंडाळा , व महाबळेश्वर तालुक्यातील o B C समाज बांधवांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते

     यावेळी पुणे येथील माजी नगरसेविका रूपाली ठोंबरे पाटील , ऑल इंडिया मुस्लिम समाज पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष अब्दुल सतार , आर पी आयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड , OBC संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे आदी उपस्थित होते . प्रा हाके पुढे म्हणाले भुजबल साहेब हे तुमचा आम्हचा आवाज असून त्यांना पद्धतशीरपणे टार्गेट करण्याचे काम केले जात आहे . त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ' एकी दाखवण्याची ही वेळ आहे OBC मध्ये ४५० जाती आहेत . जात निहाय जनगणना करा आम्ही ६०% च्या वरती आहोत सर्व सत्तास्थाने ,कारखाने , जिल्हा सहकारी मध्यावरती बॅक तुमच्या ताब्यात असताना तुमचा समाज मागास कसा? यामुळेच सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारले होते ३ :५ लाख कोटीने महाराष्ट्राचे बजेट आहे त्यातील OBC साठी o . ६% बजेटची तरतूद केवळ OBC च्या विकासाठी केली जाते हे वास्तव तुम्ही जनतेसमोर का मांडत नाही? कुणबी दाखले मिळवून आमचे राजकीय आरक्षणा हडपण्याचा डाव राजकीय मंडळीनी आखला आहे . कायदे करणाऱ्या सभागृहामध्ये आमचे नेते किती याचा विचार समाजाने करणे गरजेचे आहे

      पुणे महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका रुपाली ढोंबरे म्हणाल्या आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही त्यानाही आरक्षण मिळाले पाहिजे परंतु ओबीसी कोट्याला धक्का न लावता ते देण्यात यावे , यावर आम्ही ठाम आहोत हा राज्यकर्त्यानी घातलेला घोळ आहे मराठा समाजातील नेत्यांना आम्ही मतदान करतो , परंतु तेआमचे प्रश्न सभागृहात मांडत नाहीत . हिम्मत आमच्यातही आहे हे जरांगे यांनी लक्षात ठेवावे . पाचवी शिक्षण असलेल्या जरांगे यांच्याकडून दुसरी अपेक्षा करणे चुकीचे आहे . आम्हाला धमक्या देऊ नका नाहीतर जशास तसे उत्तर दिले जाईल . पुढील काळात OBC मुखमंत्री झाला पाहिजे आणि तो आम्ही करणारच . मराठा नेत्यांनी केवळ त्यांच्या जातीचा विचार केला आणि बेकायदेशीर आरक्षण मिळवले तर आमच्या समाजाची मते त्यांना मिळणार नाहीत . यावेळी अब्दुल सुतार , भरत लोकरे , अशोक गायकवाड , यांची भाषणे झाली .

         सी . व्ही . काळे , सौ नीलिमा खरात , शिवाजी जमदाडे , शशिकांत कोरडे यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .

       प्रा . शेखर फरांदे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला . राजेश गुरव यांनी आभार मानले .

कार्य क्रमांस - राजेश गुरव , अविनाश फरांदे , दिपक ननावरे , बुवा खरात , डॉ. मकरंद पोरे , प्रा. शेखर फरांदे , सचिन फरांदे , सुरेश कोरडे , रवि बोडके , अरुण आदलिंगे , बापू जमदाडे , शशिकांत कोरडे प्रविण सोनको , प्रवीण कुंभार , आदी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments