सोशल मीडिया, जाहिरातींच्या भुलथापांना बळी पडू नका : तहसीलदार राजेश चव्हाण.
--------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
चंदगड प्रतिनिधी
आशिष पाटील
---------------------------
कोवाड महाविद्यालय, तहसील विभाग, ग्राहक पंचायततर्फे ग्राहक दिन साजरा.
कोवाड (चंदगड ): सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फसव्या जाहिराती व अन्य प्रकार यातून नागरिकांची मोठी फसवणूक होतं आहे. मालाची गुणवत्ता व अन्य बाबी विचारात घेऊन वस्तू खरेदी करा. भुलथापांना बळी पडू नका असे मत चंदगड तहसीलदार राजेश चव्हाण यांनी व्यक्त केले. ते कोवाड येथील कला महाविद्यालय, अखिल भारतीय ग्राहक पंचायत व तहसील विभाग यांच्या ग्राहक दिनच्या संयुक्त कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या एम. एन. पवार उपस्थित होत्या.प्रास्ताविक प्रा. दिपक पाटील यांनी केले. विद्यार्थ्यानी ग्राहक जागृतीसाठी पोष्टर प्रदर्शन केले होते.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष संदीप पाटील म्हणाले ग्राहक हा संज्ञान असला तरी वस्तू खरेदी करताना फसू शकतो त्यामुळे सहजग असलं पाहिजे. असे सांगून ग्राहकांची कर्तव्य व जबाबदारी याविषयीं मार्गदर्शन केले. तर वीज पंप, घरगुती लाईट यातून ग्राहकांची मोठी फसवणूक होतं आहे. त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहणं गरजेचं असल्याचे प्रा. विलास नाईक यांनी सांगितले.
मार्केटमध्ये विक्रीसाठी असणाऱ्या वस्तूंची मूळ किंमत, त्यावरील तारीख, वजन पाहून वस्तू खरेदी करावी असे मत प्राचार्या एम. एन. पवार यांनी सांगितले. यावेळी पुरवठा अधिकारी प्रदीप शिंदे,गणपत पवार, विलास कागणकर, प्रताप डसके सूत्रसंचालन प्रा. मोहन घोळसे यांनी केले आभार प्रा. के. पी. वाघमारे यांनी मानले.
0 Comments