Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा उतर भारतीय, प्रदेशाध्यक्ष मा आदरणीय डॉ संजय जी पांडे यांचे वाशिम जिल्ह्यामध्ये आगमन व स्वागत.

 भाजपा उतर भारतीय, प्रदेशाध्यक्ष मा आदरणीय डॉ संजय जी पांडे यांचे वाशिम जिल्ह्यामध्ये आगमन व स्वागत.


अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई द्या.      स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांची मागणी

गेल्या दोन दिवसापासून सर्वदूर अवकाळी पाउस झाल्यामुळे शेतकर्याचे आतोनात नुकसान झाले आहे.यामध्ये हरभरा तूर ,गहू,भाजीपाला इत्यादी पिकाचे खूप नुकसान झाले आहे..अगोदरच शेतकरी हा अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे हवालदिल झाला आहे.पिक विम्याचे पैसे अद्याप हि काही शेतकर्यांना मिळाले नाही.एका दाण्याचे हजार दाने करणारा अन्नदाता आज आपल्याच पिकवलेल्या मालाला भाव मिळावा म्हणून सरकारशी संघर्ष करतोय.महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सोयाबीन चे उत्पादन होत असून सोयाबीन ला योग्य बाजार भाव मिळण्यासाठी जि राजकीय अनास्था आहे हि शेतकर्यासाठी आणि आपल्या कृषिप्रधान देशासाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे.प्रत्येक वेळी मतदान असताना सर्व राजकीय पक्ष आम्ही शेत्क्र्यासोबत आहोत अस ठासून सांगतात परंतु इलेक्शन संपले कि मात्र बळी राजाला आश्वासन देऊन बळी राजाचा बळी घेतात. आपल्या विदर्भामध्ये  सोयाबीन चे जास्त उत्पादन असताना सोयाबीन प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात आपल्या इकडील राजकीय मंडळी अपयशी ठरली आहे.केवळ पोकळ वल्गना देऊन वेळ मारून नेण्यात हि सर्व राज्कीय् मंडळी तरबेज आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकर्याच्या तोंडाला आलेला घास हिराउन घेतला आहे.प्रशासनाणे लवकरात लवकर नुकसान ग्रस्त शेतकर्याच्या पिकाची पाहणी करून शेतकर्यांना योग्य न्याय द्यावा अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे.नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून त्वरित शेतकर्याला मदत मिळाली नाही तर वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन,हरभरा तूर ,गहू उत्पादक शेतकर्याचा एल्गार मोर्चा काढून जिल्ह्या मध्ये उग्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष श्री गजानन देशमुख यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments