Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पाचवड ता.वाई मधील भैरव प्लाय व मुंबई टिंबर नावाच्या अनधिकृत बेकायदेशीर सागवानाची दुकाने सिल करा: जिल्हा सचिव किरण बगाडे.

 पाचवड ता.वाई मधील भैरव प्लाय व मुंबई टिंबर नावाच्या अनधिकृत बेकायदेशीर सागवानाची दुकाने सिल करा: जिल्हा सचिव किरण बगाडे.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

जावळी तालुका प्रतिनिधी

सूर्यकांत जाधव

--------------------------------------

 जिल्हा वन अधिकारी यांना निवेदनाद्वारे किरण बगाडे यांची मागणी. 

सविस्तर:-मौजे पाचवड ता. वाई येथील भैरव प्लायव मुंबई टिंबर या दुकानांमध्ये सागवानाच्या झाडाची चौकटीचे दरवाजे शो पीस, व इतर विक्रीस ठेवले आहेत त्या सागवानाच्या दरवाजा साठी मुंबई अथवा नाशिक पुणे इथून सागवानाची बांबू व कच्चा सागवानाचा माल या दुकानांमध्ये आयात केला जातो त्यातून या सागवानाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची आयात निर्यात ची शासकीय पावती अथवा शासनाला भरलेल्या कराची रॉयल्टीची कोणतीही माहिती उपलब्ध नसून याबाबत वाईफ फॉरेस्ट अधिकारी श्रीमती मगर यांना मी तक्रारी निवेदन दिले होते मात्र या तक्रारी निवेदनानुसार सदर दुकान धारकांवर कोणतीही कार्यवाही अथवा कारवाई झालेली दिसून येत नाही तरी अनधिकृत व बेकायदेशीर सागवानाचा व्यापार करणाऱ्या भैरव प्लाय मुंबई टिंबर या दुकानदारांची दुकाने संपूर्ण सागवानाच्या झाडांची दरवाजे त्यांची साधन सामुग्री आयात निर्यात यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करून तात्काळ दुकाने सील करा तसेच या दुकानदारांना पाठीशी घालणाऱ्या श्रीमती मगर यांच्या संपूर्ण कामकाजाची चौकशी करून कारवाई करा असे न झाल्यास लोकशाहीतील मार्गाने तीव्र आंदोलन छेडणारअसा इशारा किरण बगाडे यांनी दिला.

Post a Comment

0 Comments