Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जावळीत ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यन्वित होणार, सातारा जिल्हा पोलिस दल व जिल्हा परिषद सातारा यांचा संयुक्त उपक्रम.

  जावळीत ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यन्वित होणार, सातारा जिल्हा पोलिस दल व जिल्हा परिषद सातारा यांचा संयुक्त उपक्रम.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मेढा:प्रतिनिधी 

प्रमोद पंडीत      

------------------------------------

सातारा  जिल्हा पोलिस अधीक्षक मा श्री . समीर शेख व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री ज्ञानेश्वर खिलारी याच्या प्रयत्नातून व सयुक्त विद्यामाने ग्राम सुरक्षा यत्रणा कार्यान्वित करण्या बाबत मेढा पोलिस स्टेशन येथे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम कळश मंगल कार्यलयात  आयोजित करण्यात आला होता

मेढा पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी API संतोष तासगावकर आणि API अश्विनी पाटील, गणेश लोकरे वरिष्ठ विभागीग अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा सातिश शिंदे संपर्क अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा आदीच यावेळी प्रमुख उपस्थिती होती

ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डि .के . गोर्डे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेची स्पष्ट आणि सुठसुठीत भाषेत सर्व जावली तालुक्यातुन आलेले ग्रामस्थानां सागितले ते पुढे म्हणाले कि चोरी , दरोड्याच्या घटनेत चोर होणार तात्काळ जेरबंद . ग्रामसभा, सरकारी योजनांची ग्रामस्थांना तात्काळ माहिती मिळणार असे सागितले तर ही यंत्रणा अतिशय महत्त्व पुर्व यत्रणा आहे . तालुक्यातील पोलिस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावात प्रभाविरित्या ग्राम सुरक्षा कार्यान्वित होणार असल्याची माहिती मेढा पोलिस स्टेशने सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यानी माहिती दिली .

ग्राम सुरक्षा यंत्रणा पोलिस स्टेशन हद्दीत कार्यन्वित करण्यासाठी प्रत्येक कुटूबास ५० / - [ पन्नास रुपये ] खर्च येणार आहे तर तो खर्च सर्व सामान्य जनतेकडून वसुल न करता . १५व्या वित्त आयोग मधून खर्च करण्याचे निदर्शन सातारा जिल्हा परिषदेने ग्राम पंचायतीस खर्च करण्यास सागितले आहे . असे डि .के . गोर्डे म्हणाले

सपुर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर १८००२७०३६००/९८२२१८ वर नोंदणी केलेल्या नागरिकांनी आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकू जातो परिसरातील नागरिकांना घटना घटत असतांनाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते तसेच एकादे वाहन चोरीस गेले हे लक्षात येताच तेल फ्री वर फोन केल्यावर लगेच १0 किलोमीटर परिसरात ही बातमी समजाली जाती व तातकाळ वाहनाचा तपास लागतो

यावेळी AP I संजोष तासगावकर , FPI अश्विनी पाटील, गणेश लोकरे , वरिष्ठ विभागीय अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रना सतिश शिंदे , सपर्क अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रण गोपनिय अंमलदार अभिजित वाघमळे, यांच्यासह मेढा पोलिस स्टेशनचे अमलदार व हद्दीतील सरपंच , उपसरपंच ' सदस्य , वरिष्ठ नागरिक, पोलिस पाटील , पत्रकार, तलटी, कोतवाल . अंगणवाडी सेविका, आशा, नर्स - डॉक्टर वकील व समाज सेवक प्रतिष्ठीत व्यक्ती हजर होतो

मेढा पोलिस स्टेशनचे API संतोष तासगावकर साहेब यांनी सर्वाचे आभार मानले .

Post a Comment

0 Comments