Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गौळवाडी डिजिटल शाळा कामाचा शुभारंभ.

 गौळवाडी डिजिटल शाळा कामाचा शुभारंभ.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

चंदगड प्रतिनिधी

आशिष पाटील 

--------------------------------------

   मराठी विद्यामंदिर गौळवाडी (ता.चंदगड) या शाळेला डिजिटल शाळा करण्यासाठी निधी मंजूर  आला होता. या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

चंदगड मतदारसंघातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थींना उच्च आणि अद्यावत दर्जाचा शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याचा माझा संकल्प आहे. त्याच्यासाठी मी एक पाऊल टाकले याच मला समाधान आहे. येणाऱ्या काळात मतदारसंघातील सर्व शाळा डिजिटल आणि अद्यावत करणार आहे. शेवटी शिक्षण हाच जनसामान्यांच्या प्रगतीचा 'राजमार्ग' आहे आणि चंदगड वासीयांच्या प्रगतीचा हा 'राजमार्ग' मी निर्माण करणारच! असा विश्वास शिवाजीराव पाटील यांनी दिला. 

यावेळी माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील, शांताराम पाटील(बापू), ज्योतीताई पाटील, यशवंत सोनार, आर.जी.पाटील सर, तुकाराम बेनके, तुकाराम कांबळे (सरपंच), अमर नाईक, दिपकदादा पाटील, गावातील ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments