देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेला शब्द केला पूर्ण मालेगावचा पाणी प्रश्नाचा शासन आदेश प्राप्त.

 देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेला शब्द केला पूर्ण मालेगावचा पाणी प्रश्नाचा शासन आदेश प्राप्त.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजित ठाकुर 

--------------------------------

 अनंतरावजी देशमुख यांच्या मागणीला यश.

 ॲड.नकुल देशमुख यांची माहिती.

रिसोड - मालेगाव शहराचा चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागला. ४ डिसेंबर रोजी शासन आदेश प्राप्त झाला असून. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आश्वासनाची पूर्तता केली व माजी खासदार अनंतरावजी देशमुख यांच्या मागणीला यश आले आहे .अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे रिसोड-मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड.नकुलदादा देशमुख यांनी दिली आहे.

मालेगाव शहरातील जनता चाळीस वर्षांपासून पाण्याच्या समस्येला समोर जात होते. त्यांच्या पदरी अनेक वेळा निराशा आली होती. परंतु माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी रिसोड येथे 13 एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मालेगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जाहीर सभेत मागणी केली होती. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हजारो लोकांच्या जनसमुदायासमोर चाकातीर्थ जलाशय ते मालेगाव शहर पाणीपुरवठा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत देवेंद्रजी फडणवीस यांनी मालेगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटवला व आपल्या शब्दाची पूर्तता केली असून माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्या मागणीला व भारतीय जनता पक्षाचे रिसोड विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड नकुल देशमुख यांच्या पाठपुराव्यास यश आले असून मालेगावकर नागरिकांच्या वतीने मालेगाव पाणीपुरवठा योजनेस अंतिम मंजुरात मिळून शासकीय आदेश प्राप्त झाल्यानंतर आनंदाचे वातावरण आहे.

दिनांक ४ डिसेंबर रोजी प्राप्त झालेल्या शासन आदेशात चाकतीर्थ जलाशय ते मालेगाव शहर पाणीपुरवठा योजनेस ४६ कोटी ४७ लक्ष ४९६०३ रुपये मंजुरात करण्यात आलेले आहेत. यामुळे मागील ४० वर्षापासून प्रलंबित असलेला मालेगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागला असून.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित दादा पवार ,खासदार संजय जी धोत्रे यांचे माजी मंत्री अनंतराव देशमुख यांचे देशमुख यांनी आभार व्यक्त केले.

चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेला मालेगाव शहरातील जनतेचा हा दिवाळीचा प्रश्न कायमचा मार्गी लागल्यामुळे मालेगावकर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून जनतेतून मागणीची पूर्तता केल्याबद्दल आनंद व्यक्त होत आहे

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.