बलात्कार प्रकरणी एकाला तीन वर्षे कारावासाची शिक्षा.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
----------------------------------
पिंगळी येथील एका हॉटेलवर मोलमजुरी करणाऱ्या महिलेचा विनयभंग करून बलात्कार करणाऱ्या हकसाहेब मान्नान मंडल (राहणार गोंगरा राणाबंद जि. नादिया. राज्य पश्चिम बंगाल).ह्या इसमास वडूज न्यायालयाने तीन वर्षे सश्रम करावास व दहा हजार दंड अशी शिक्षा ठोटावली. पिंगळी बुद्रुक येथील हॉटेल अवतात येथील मोलमजुरी करणारी पीडित फिर्यादी महिला हॉटेलच्या फॅमिली रूम मध्ये झोपलेली होती. त्यावेळी आरोपी हकसाहेब मन्नान मंडल याने तिचा विनयभंग करत तिच्यावर बलात्कार केला. याप्रकारणी पीडितेने दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
0 Comments