Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

तालुकास्तरीय हस्तलिखित स्पर्धेतबिभवी शाळेचा बोलबाला कायम.

 तालुकास्तरीय हस्तलिखित स्पर्धेतबिभवी शाळेचा बोलबाला कायम.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

भणंग प्रतिनिधी

शेखर जाधव 

-----------------------------------

. सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास स्पर्धेत तालुकास्तर* हस्तलिखित स्पर्धा *( लहान गट ) यामध्ये जिल्हा परिषद प्राथ.शाळा बिभवी ता. जावली यांनी प्रथम संपादन केला असून (मोठा गट ) यामध्ये तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले आहे. लहान गटाचे हस्तलिखित तयार करण्यासाठी सौ. सुनिता कामटे मॅडम यांनी मार्गदर्शन केले त्यांना पालकांनी व बालचमू यांनी सहकार्य केले. त्याबरोबर मोठ्या गटाचे हस्तलिखित तयार करण्यात सौ. दिपाली दुंदळे , सौ. अमिता एरंडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले तसेच बालचमूनी सहकार्य केले .मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर वेंदे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. तालुका स्तरावर प्रथमक्रमांक मिळवून लहान गट हस्तलिखिताची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या यशाबद्दल जावली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. संजय धुमाळ, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. तोडरमल मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. कर्णे साहेब. केंद्रप्रमुख श्री अरविंद दळवी साहेब तसेच बिभवी गावचे सरपंच, उपसरपंच , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य , ग्रामस्थमंडळ बिभवी, आजी माजी पालकवर्ग यांनी यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

0 Comments