Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

निढोरीत श्रीमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा संपन्न.

 निढोरीत  श्रीमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा संपन्न.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड प्रतिनीधी

जोतीराम कुंभार

-----------------------------

     निढोरी, ता. कागल येथे उत्तराभिमुख  गणेश मंदिरामध्ये श्रीमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा परमपूज्य अमृतानंद महाराज यांच्या हस्ते धार्मिक मंत्रोच्चारात संपन्न झाला. दिपक बहुधान्ये यांनी धार्मिक विधी केले. मंदिराचे सौंदर्य सुवर्ण झळाळीने आणखीन खुलले आहे. 

         ओमसाई बहुउद्देशीय कला, क्रीडा व सांस्कृतिक युवा मंचच्या पुढाकाराने या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. यावेळी अमृतानंद महाराज यांनी प्रवचन देताना गणेश भक्तीचे महात्म्य, मंदिराचे पावित्र्य, पूजा पाठ आणि मनःशांतीसाठी आवश्यक योगसाधना याविषयी मार्गदर्शन केले.अमृतानंद महाराज यांच्या हस्ते प्रमुख देणगीदार तसेच मंदिराचे प्रमुख राजेंद्र सुतार यांचा सत्कार करण्यात आला.

                  दहा हजाराच्यावर गणेशभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.  मध्यरात्रीपर्यंत गुरुकृपा भजनी मंडळाच्या सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम झाला. स्वागत संजय सुतार, प्रास्ताविक प्रा. रविंद्र शिंदे, सुत्रसंचालन संतोष शिंदे यांनी केले. आभार विश्वास दरेकर यांनी मानले.

          .............

Post a Comment

0 Comments