Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर शारीरिक अत्याचार

 लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर शारीरिक अत्याचार.

-----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

----------------------------------------

गांधीनगर:- लग्नाचे आमिष दाखवून ठार मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी शमुवेल उर्फ देवा सुबराव पांढरे वय 26 रा. नवे पारगाव ता. हातकणंगले जि कोल्हापूर याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद माया अश्विन पाटोळे वय 35 रा. गांधीनगर या महिलेने गांधीनगर पोलीस ठाण्यात  दिली .


याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी पीडित महिलेचा असहाय्यतेचा फायदा घेत आपण लग्न करून सुखाचा संसार करू असे म्हणत तिच्यावर शिरोली, हातकलंगले येथील लॉजवर तसेच फिर्यादीच्या गांधीनगर येथील राहते घरी वेळोवेळी शारीरिक अत्याचार केले. तसेच फिर्यादी यांनी लग्नासाठी तगादा लावला असता तिला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. त्यावरून गांधीनगर मध्ये शमुवेल पांढरे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार करत आहेत.

Post a Comment

0 Comments