Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुरगुड येथे रस्त्यासाठीशिवभक्तांचा रास्ता रोको.

 मुरगुड येथे रस्त्यासाठीशिवभक्तांचा रास्ता रोको.

---------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

मुरगुड/प्रतिनिधी

जोतीरामकुंभार

---------------------------

 शिवतीर्थ मुरगुड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील अपूर्ण अवस्थेतील रस्त्याची नगरपालिकेने अद्यापही दुरुस्ती केली नाही वेळोवेळी नगरपालिकेस कळवूनही समाधानकारक उत्तर न आल्यामुळे शिवभक्तांनी आणि येथील नागरिकांनी शिव पुतळ्यासमोरील मुख्य रस्त्यावर या मांडून रास्ता रोको आंदोलन केले यामुळे दोन्ही बाजूस बाराच वेळ गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.

  येथून जवळच पाच फुटावर असलेल्या मुरगुड नगरपालिका असून देखील सर्वांचे दुर्लक्ष आहे अधिकारी यांच्यासमोर वारंवार अपघात होत असतात तरीदेखील नगरपालिका प्रशासन इकडे दुर्लक्ष करीत आहे या ठिकाणचा रस्ता हा सकल असल्यामुळे अपघाताचे प्रमाण जास्त आहे तरी नगरपालिका प्रशासन लक्ष देणार काय ?आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केली आहेत लेखी निवेदने सुद्धा दिलेली आहेत.

  यावेळी मुख्याधिकारी संजय घार्गे यांनी आंदोलन थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले या वेळी सोमनाथ यरनाळकर ,सर्जेराव भाट, ओमकार पोतदार ,विशाल मंडलिक, सुशांत महाजन ,पृथ्वी चव्हाण ,संकेत भोसले ,प्रदीप भोपळे ,मयूर सावर्डेकर ,जगदीश गुरव ,रोहित मोरबाळे ,रणजीत मोरबाळे, आदी‌ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments