Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

ग्राहकाच्या अडचणी सोडवण्यासाठी ग्राहकपंचायतने सहकार्य करावे तहसीलदार अनिता देशमुख.

 ग्राहकाच्या अडचणी सोडवण्यासाठी ग्राहकपंचायतने सहकार्य करावे तहसीलदार अनिता देशमुख.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

------------------------------

ग्राहकाच्या अडचणी सोडवण्यासाठी ग्राहक पंचायतने सहकार्य करावे असे आव्हान राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

 राष्ट्रीय ग्राहक दिन राधानगरी तहसील कार्यालयातील शाहू सभागृहामध्ये आयोजित केला होता त्यामध्ये प्रथम ग्राहक चळवळीचे जनक बिंदू माधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला हा अर्पण करण्यात आला त्यानंतर तहसीलदार श्रीमती देशमुख म्हणाले की ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ग्राहक पंचायतने सहकार्य करावे तसेच ग्राहक पंचायत ची चळवळ ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्या चे सांगून मार्गदर्शन केले

या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त राधानगरी शाळेच्या विद्यार्थ्यांची एसटी स्टँड ते तहसीलदार कार्यालया पर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली

कार्यक्रमास जिल्हा महिला संघटिका सौ पूनम देसाई जिल्हा उपाध्यक्ष सतीश फणसे तालुकाध्यक्ष डी जी चौगुले अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे अध्यक्ष विठ्ठल चव्हाण रवींद्र घाडगे संतोष हावळ उमेश गायकवाड डी डी पाटील इत्यादी ग्राहक पंचायत पदाधिकारी हजर होते शेवटी आभार तहसीलदार कार्यालयातील पुरवठा अधिकारी पवार यांनी मांडले

Post a Comment

0 Comments