गगनगिरी ट्रस्ट च्या वतीने पुरस्काराचे वितरण.
गगनगिरी ट्रस्ट च्या वतीने पुरस्काराचे वितरण.
------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
साळवन प्रतिनिधी
प्रकाश मेंगाणे
-----------------------------
किल्ले गगनगडावर दत्तजयंतीनिमित्त तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना गगनगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ट्रस्टी रमेशराव माने, शांताराम पाटणकर, संजय पाटणकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा झाला.
गगनगिरी विश्वस्त ट्रस्ट, किल्ले गगनगड, गगनबावडा यांच्या वतीने तालुक्यात उत्कृष्ट काम करणारे युवक, शासकीय कर्मचारी, व्यक्ती, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दरवर्षी गगनगिरी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी गगनगिरी पुरस्काराने गौरविलेल्या व्यक्ती अशा : आदर्श युवक : अरुण बंडा पाटील (खेरीवडे), आदर्श कर्मचारी : सुनील जालिंदर ठोंबरे (आरोग्य
सहाय्यक), आदर्श प्राथमिक शिक्षक : नामदेव महादेव खाडे (विद्यामंदिर मेडेटेकवाडी), महेश आनंदराव दावणे (केंद्रशाळा विद्यामंदिर सांगशी), आदर्श माध्यमिक शिक्षक : रामचंद्र बापू पाटील (माध्यमिक विद्यालय शेळोशी), तानाजी पांडुरंग घाटगे (यशवंत माध्यमिक विद्यालय असंडोली), गगनगिरी विशेष पुरस्कार : व्ही. एम. पाटील (उदयसिंह ऊर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय
असळज), गगनगिरी व्यक्ती पुरस्कार : पी. जी. शिंदे, (माजी अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.) याप्रसंगी तहसीलदार शैलजा पाटील, गटविकास अधिकारी राजेंद्र जाधव, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत आवारे, सरपंच मानसी कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, नंदकुमार पोवार उपस्थित होते.
Comments
Post a Comment