Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विद्या मंदिर कोनोली तर्फे असंडोली(ता. राधानगरी )तालुका स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत धवल यश.

 विद्या मंदिर कोनोली तर्फे असंडोली(ता. राधानगरी )तालुका स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत धवल यश.

--------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

पन्हाळा प्रतिनिधी 

 आशिष पाटील 

--------------------------

विद्या मंदीर कोनोली तर्फ असंडोली शाळेच्या वतीने समूहगीत व समूहनृत्य या विभागात सादरीकरण करण्यात आले. यामध्ये समूहगीतमध्ये लहान गटातील मुलांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर मोठ्या गटातील मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला. व जिल्हा स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी होण्याचा बहुमान मिळवला. म्हासुर्ली केंद्रातून जिल्हा स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी होणाचा बहुमान पहिल्यांदा विद्या मंदीर कोनोली तर्फ असंडोली शाळेला मिळाला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री डी एम पोवार सर यांचे प्रोत्साहन तर संगीत विशारद श्री सुहास पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. श्री आंनदा गडकर सर, श्री डी एस पाटील सर, श्री आनंदा पाटील सर, सौ. नंदा जाधव मॅडम कु पुजा पाटील मॅडम यांचे सहकार्य लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दीक अभिनंदन करण्यात आले

Post a Comment

0 Comments