बोरगावं पोलिसांची धडाकेबाज कामगिरी महाराष्ट्रात बंदी असलेला पंचवीस लाखाचा (तंबाखु) गुटखा केला जप्त.
बोरगावं पोलिसांची धडाकेबाज कामगिरी महाराष्ट्रात बंदी असलेला पंचवीस लाखाचा (तंबाखु) गुटखा केला जप्त.
-----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर.
--------------------------------
श्री समीर शेख पोलीस अधीक्षक, श्रीमती आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्रात बंदी असलेल्या (तंबाखु) गुटखा अवैद्यरित्या विक्रीवर, कारवाई करण्याच्या सूचना श्री किरणकुमार सूर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा.तसेच श्री.रवींद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक, बोरगाव पोलीस ठाणे यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने बोरगावं पोलीस कार्यतत्पर होते. बोरगावं पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र तेलतुंबडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली कि, कराड ते सातारा जाणाऱ्या हायवे लेनने गुटख्याची वाहतूक करणारी गाडी जाणार आहे. अशी माहिती मिळताच ते स्वतःआणि गुन्हेशाखा प्रकटीकरणाचे अंमलदार हे बोरगावं पोलीस स्टेशनचे हद्दी मध्ये काशीळ ते नागठाणे हायवे रोड ने पेट्रोलिंग करीत असताना,मौजे अतीत गावच्या हद्दीतील कराड ते सातारा हायवेवरील लेन वर वाडेकर पेढेवाले यांच्या दुकानाजवळ आले असता. त्यांना अशोक लेलंडकंपनीचा चा बडा दोस्त वाहन क्रमांक Mh09GT 1355 हे संशयित वाटल्याने ते वाहन थांबवून त्यातील चालकाची चौकशी केली असता त्या चालकाने उडवा उडवी ची उत्तरे दिलीअसता गुन्हे प्रकटिकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर वाहणाची तपासणी केली असता त्यामध्ये हिरा गुटखा, पानमसाला गुटखा,रॉयल 717 टोबाको गुटखा असा मुद्देमाल सापडला असता मुद्देमाल व वाहन असा एकूण पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सदरबाबत अपर्णा भोईटे सहाय्यक आयुक्त सातारा,तसेच अन्न सुरक्षा विभाग अधिकारी श्रीमती वंदना विठ्ठल रुपनवर, श्री इम्रान समीर हवालदार,श्रीमती प्रियंका नामदेव वाईकर,यांना कळवले असता त्यांनी समक्ष हजर राहून ताब्यात घेतलेला मुद्देमाल जप्त केला असून, अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 चे कलम 26(2)(I), 26(2)(iv),27(3),(e)30(2)(a)3,59, भा.द.वी.स.188,272,273,328,34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रवींद्र तेलतुंबडे सहायक पोलीस निरीक्षक, गुन्हेप्रकटी करण शाखेचे पोलीस हवालदार दादा स्वामी, पोलीस नाईक प्रशांत चव्हाण,दीपक कुमार मांडवे, पोलीस कॉन्स्टेबल केतन जाधव, पो.हवा अमोल सपकाळ, पो.कॉ. विशाल जाधव, चालक पो. ना. उत्तम कदम. यांनी सदर कारवाई केली असून आरोपी नावे अनुक्रमे (1) बाबासो बंडा मडके राहणार-महावीर चौक रुई, जिल्हा कोल्हापूर, (2)दीपक कल्लाप्पा अबदान राहणार महावीर चौक रुई,जिल्हा कोल्हापूर, असे आहेत. बोरगाव पोलिसांच्या सतर्क कार्यतत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment