Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूर युवासेना यांच्या वतीने डॉ.विलास पाटील यांना निवेदन.

 कोल्हापूर युवासेना यांच्या वतीने डॉ.विलास पाटील यांना निवेदन.

---------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

करवीर प्रतिनिधी

रोहन कांबळे 

---------------------------

 सारथी, बार्टी, महाज्योतीची पी.एचडी फेलोशिप साठी पुन्हा घेण्यात येणारी १० जानेवारी २०२४ रोजी'ची सीईटी परीक्षा रद्द करुन सरसकट फेलोशिप द्यावी.तसेच या पेपर मधील गोंधळ प्रकरणी संबंधित अधिकार्ऱ्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी युवासेना शिष्ट मंडळानी आज केली होती.

     २४ डिसेंबरला आपण जी अन्यायी सीईटी परीक्षा घेतली ती इतिहासातील जिझिया सारखी होती . परीक्षा घेण्याचं आपल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी घोषित केलं पण आपल्या अधिकारी वर्गाला साधी नवीन प्रश्नपत्रिका तयार करता आली नाही म्हणून सेटची जुनी प्रश्नपत्रिका आहे तशी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी देण्यात आली आणि अनेक परीक्षा केंद्रांवर ज्या प्रश्नपत्रिका आल्या त्या बंद न करता लिफाफामधुन सील नसलेल्या प्रश्नपत्रिका होत्या अशी अनेक विद्यार्थ्यांकडून तक्रारी होत्या. यामुळे ही परीक्षा रद्द केली. यामुळे १० जानेवारी २०२४ रोजी ही सीइटी परीक्षा पुन्हा घेवून सरकार काय दिवा लावणार आहे..?

  या प्रकरणी जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी.जर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा सरकारचा हेतू असेल तर आम्ही हि परीक्षा उधळून लावू महाराष्ट्रातील सर्व पीएचडी साठी फेलोशिप मागणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देऊ. ही अन्यायी सीईटी परीक्षा रद्द करावी. अन्यथा उग्र आंदोलन करू असे निवेदन युवासेनेच्या वतीने सारथी चे प्रभारी संचालक डॉ.विलास पाटील यांना देण्यात आले.

यावेळी उपस्थित युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, युवासेना विभाग प्रमुख, श्रीणंद वडर, प्रल्हाद वडर,ऋषभ सुरकूले आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments