Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बिद्रीत झाली के पी समर्थकांची गर्दी!

 बिद्रीत झाली के पी समर्थकांची गर्दी!

---------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

--------------------------------------

दिग्गज विरोधकांना सभासदांनी आणली सर्दी!

आरोप प्रत्यारोप करत दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लि बिद्री या कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी संचालक मंडळावर विरोधकांनी केलेल्या टीकेला सभासदांनी माजी आमदार के पी पाटील यांच्या श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीचे 25 च्या 25 उमेदवार निवडून देत चोख प्रत्युत्तर दिले 

दिग्गजांनी हि

निवडणूक प्रतिष्ठेची केली होती विरोधी पक्षांचे उमेदवारांना पराभूत करुन येणाऱ्या निवडणुकीत आमदार कोण होणार आहे याची जाणीव करून दिली अशी चर्चा निकाल ऐकण्यासाठी आलेल्या सभासदामधून बोलली जात होती

निवडणूक केंद्रावर दुपारी 2 वाजता माजी आमदार के पी पाटील आल्यावर कार्यकत्यांनी जल्लोष करत के पी पाटील यांना खांद्यावर घेतले 

निवडणूक निकालानंतर के पी पाटील म्हणाले हा विजय सभासदांचा व प्रामाणिक पणे काम केलेल्या कार्यकर्त्यांचा आहे.

आम्ही केलेल्या कामाची पोचपावती  पाच हजारांहून अधिक मताधिक्य देउन सभासदांनी दिली आहे.

----------------------------------

मि काय महाडिक आहे का?

के पी पाटील 

----------------------------------

मतदान केंद्रावर के पी पाटील आल्यावर कार्यकत्यांनी त्यांना शड्डू मारा असं सांगितल्यावर के पी पाटील म्हणाले मि काही शड्डू मारायला महाडिक नाही अशी मिश्किल टिप्पणी केली.

-------------------------------------

मत मोजणी चे अचूक नियोजन!

---------------------------------------निवडणुक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी पध्दतशीरपणे  मतमोजणी टेबलावर नियोजन केल्याने मतमोजणी कौल चार वाजता स्पष्ट झाला होता ,

निकाल स्पष्ट होताच के पी पाटील यांनी काकडे यांच्या कामाचे कौतुक केले तसेच पोलीस व पत्रकार याचे पण आभार मानले तर विरोधी पक्षाच्या नेत्यांना देव सुबुद्धी देवो अशा भावना व्यक्त केल्या

Post a Comment

0 Comments