सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करून समाजा समोर आर्दर्श ठेवावा. डॉ. राजेंद्र सरकाळे.
सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करून समाजा समोर आर्दर्श ठेवावा. डॉ. राजेंद्र सरकाळे.
---------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मेढा प्रतिनिधी
शेखर जाधव
---------------------------
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन-२३-२४ या वर्षात "७५ व्या अमृतमहोत्सवी" वर्ष म्हणून साजरे करत असताना मेढा सोसायटीचे सहकार मंदीर येथे आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न झाले त्यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र सरकाळे म्हणाले बँकेचे सेवक यांनी आरोग्य निरोगी राहावे व सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे सातारा जिल्हा बँकेचे बॅकेचे संचालक आदरणीय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब , राजेंद्र राजपुरे, ज्ञानदेवजी रांजणे,प्रशासकीय अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार जावली व महाबळेश्वर तालुक्यातील सर्व सेवक यांचे व त्यांचे कुटुंबीय आणि विकास सोसायट्याचे सचिव यांचे कुटुंबीय यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी
" धन्वंतरी डायबेटिस सेंटर , सातारा डॉ. ओंकार पाटील व श्री. ऋषिकेश जाधव समन्वयक यांचे मदतीने ७० व्यक्ती यांची तपासणी, डायबेटिस व ब्लड प्रेशर तपासणी आणि ई.सी.जी तसेच आवश्यक ती शारीरिक तपासणी करण्यात आली.
याशिवाय माऊली ब्लड बँक, सातारा डॉ. गिरीश पेंढारकर व त्यांचे सहकारी यांचे वतीने रक्तदान शिबीरामध्ये बॅक सेवक व तालुक्यातील रक्तदाते यांनी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी " दानात दान रक्तदान" करावे म्हणून ५० लोकांनी रक्तदान केले.
यावेळी जिल्हा बँकेतर्फे डॉ. ओंकार पाटील ,डॉ. गिरीश पेंढारकर यांचे आभार मानले
या प्रसंगी मा.राजेंद्र भिलारे सरव्यवस्थापक, भानुदास भंडारे , अल्प मुदत, उध्दवराव देशमुख, प्रविण निकम , जयवंतराव पवार, प्रशांत देशमुख, विभागिय विकास अधिकारी आणासाहेब फरांदे व राजेंद्र निकम, कांतीभाई देशमुख, श्रीरंग जवळ ,विकास अधिकारी संजय निकम, प्रकाश झोरे, गजानन राजपुरे, नारायण जाधव, दत्तात्रय दुर्गावळे, दिपक पार्टे, अरुण खटावकर,संतोष देशमुख, सुर्यकांत चिकणे, सागर गुरव, मुख्तार शेख, शिरसाट,प्रविण धनावडे,अक्षय धनावडे, धनंजय महामुलकर, अपर्णा जांभळे संतोष पवार आकाश भिलारे अश्विनी जवळ कर्मचारी पोफळे ,निकम तसेच दोन्ही तालुक्यातील सचिव/ बँक सेवक उपस्थित होते.
उपस्थीतांचे स्वागत आणासो फरांदे यांनी केले तर आभार सविता कदम व वैशाली दळवी या शाखाप्रमुखांनी मानले
धावपळीच्या युगात , कामाच्या व्यापात कर्मचार्यांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते त्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राबवलेला उपक्रम हा सहकारातील इतर संस्थांनी आदर्श घेण्यायोग्य स्तुत्य आहे :-
मा चंद्रकांत देशमुख ( माजी उपसभापती जावळी )
Comments
Post a Comment