Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

हलकर्णी कॉलेजमध्ये आंतर महाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन.

 हलकर्णी कॉलेजमध्ये आंतर महाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

चंदगड प्रतिनिधी

आशिष पाटील

----------------------------

हलकर्णी( चंदगड ): दौलत विश्वस्थ संस्थेचे हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरूवर्य गुरूनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी (सोमवार दि. १ जानेवारी २०२४ रोजी) सकाळी १० वाजता महाविद्यालयामध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी विविध विषय देण्यात आले असून पाच क्रमांक काढले जाणार आहेत. यामध्ये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे बक्षिसाच्या स्वरूप असणार आहे. या स्पर्धेचे सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे


• स्पर्धेचे विषय •


१. मातीतल्या सुख-दुःखाला बोलकं करणारा कवी : ना.धों. महानोर


२. लोकशाहीचे चार स्तंभ


३. गुरुवर्य गुरुनाथ विद्वान पाटील यांचे जीवन व कार्य


४. नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्याला स्वावलंची बनवेल का ?


५. ISRO : यशस्वी इतिहासाची सुवर्णपाने


६. शिवरायांसि आठवावे


 


• पारितोषिके •


प्रथम क्रमांक: रोख रू: ३००० व सन्मानचिन्ह


द्वितीय क्रमांक: रोखरू : २००० व सन्मानचिन्ह


तृतीय क्रमांक: रोखरू : १००० व सन्मानचिन्ह


उत्तेजनार्थ १ : रोख रू: ५०० व सन्मानचिन्ह


उत्तेजनार्थ २ : रोख रू: ५०० व सन्मानचिन्ह



स्पर्धेचे नियम


१. या स्पर्धेमध्ये ज्युनिअर, सिनिअर व पोस्ट ग्रज्युएटच्या विद्याच्यांना सहभागी होता येईल. २. प्रत्येक महाविद्यालयातील जास्तीत जास्त चार स्पर्धकांना भाग घेता येईल.


३. सोवत प्राचायांचे शिफारस पत्र असने बंधनकारक.


४. प्रत्येक स्पर्धकाला किमान ५ व कमाल ७ मिनिटांचा वेळ दिला जाईल.


५. प्रत्येक स्पर्धकास प्रवेश शुल्क ५० रू. राहील.


६. परीक्षकांचा निर्णय सर्व स्पर्धकांना बंधन कारक राहील.

Post a Comment

0 Comments