Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नागाव येथे 1कोटी 79 लाखांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ.

 नागाव येथे 1कोटी 79 लाखांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ.

--------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

शिरोली प्रतिनिधी 

अमित खांडेकर 

--------------------------------

नागाव,ता.हातकणंगले येथे 1 वर्षांमध्ये 1 कोटी 79 लाखांची विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. या कामाचा आज प्रातिनिधीक स्वरूपात शुभारंभ माजी आमदार अमल महाडीक व खासदार धैर्यशील माने यांच्या शुभ हस्ते नागाव फाटा येथे संपन्न झाला. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना जनसामान्यांच्या पर्यंत पोहचवण्याचे आव्हान नेते मंडळींनी कार्यकर्त्यांना केले , नागाव फाटा ते नागाव या मुख्य रस्त्यासाठी 75 लाख रुपये अमल महाडिक यांनी मंजूर केले आहेत.त्याचबरोबर मराठी शाळा तीन खोल्या बांधणे साठी 30 लाख रुपये,नागाव फाटा गटर करणेसाठी 15 लाख रुपये,दलित वस्तीतून संभाजीनगर 12 लाख रुपये,प्राथमिक उपकेंद्रसाठी 7 लाख रुपये असे सुमारे 1 कोटी 39 लाखांची विकासकामे अमल महाडिक यांनी मंजूर केली आहेत. खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून पेव्हिंग ब्लॉक साठी 10 लाख रुपये,इंदिरा वसाहत 10 लाख रुपये, नागाव फाटा मेन रोड 20 लाख रुपये असा एकूण 40 लाखांचा निधी मंजूर करण्यांत आला, विकासकामांचे सर्व नागरिकांतून कौतुक होत आहे. यावेळी किरण मिठारी, अरुण माळी, विजय पाटील,प्रकाश पोवार, आशानंद मिठारी,गणपती माळी, विजय बाचने, विवेक नागावकर ,सर्जेराव डाफळे राजू जाधव,दीपक कांबळे अक्षय कांबळे अशोक ऐतवडे,सुनिल यादव,अरुण हराळे,ग्रामपंचायत सदस्या अश्विनी पाटील,सुलोचना कांबळे,मनीषा पाथरे, ग्रामपंचायत सदस्य अमित खांडेकर, सागर गुडाळे, कुमार राठोड यांच्यासह विकास आघाडीचे कार्यकर्ते,ग्रामस्थ, महिला,तरुण मंडळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments