प्रसिद्ध असणाऱ्या बाळूमामा देवस्थान आदमापुर येथील भक्तांना नाम मात्र किमतीमध्ये धान्यवाटप 26 जानेवारी पूर्वी न केल्यास बेमुदत उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार.मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील.

 प्रसिद्ध असणाऱ्या बाळूमामा देवस्थान आदमापुर येथील भक्तांना नाम मात्र किमतीमध्ये धान्यवाटप 26 जानेवारी पूर्वी न केल्यास बेमुदत उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार.मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

------------------------------

भुदरगड तालुक्यातील आदमापुर येथील प्रसिद्ध असणारे बाळूमामा देवस्थान मधील नाममात्र किमतीमधील धान्यवाटप कर्मचाऱ्यांच्या दादागिरीमुळे बंद ठेवण्यात आले होते त्याचे वाटप दिनांक 26 जानेवारी 24 आत न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर आदमापुर देवस्थानचे प्रशासक यांना देण्यात आले असल्याची माहिती भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी फ्रंट लाईन न्यूज प्रतिनिधी शी बोलताना दिली


आदमापूर येथील प्रसिद्ध असणारे बाळूमामा देवस्थान या देवस्थाना स कोकण कोल्हापूर कर्नाटक येथून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात ते भाविक बाळूमामा देवस्थान ला पैसे व धान्य रूपात भेट देत असतात ते धान्यबाळूमामा देवस्थानचे कर्मचारी ना मात्र किंमत न घेता ते जादा दराने धान्य भक्तांना वाटप करत असतात व भक्तांच्या कर्मचारी दादागिरी करत असतात या संदर्भात भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी इलेक्ट्रिक मीडिया व प्रेस मीडिया यांच्यामार्फत आवाज उठवला याची बाळूमामा देवस्थानचे प्रशासक यांनी दखल घेऊन संबंधित देवस्थानच्या कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून गेले पंधरा दिवस झाले असून अद्याप भक्तांना नाममात्र किमतीमध्ये धान्य सुरू नाही हे नाममात्र किमतीचे धान्य भक्तांना दिनांक 26 जानेवारी 24 पूर्वी वितरण झाले नाही तर दिनांक 26 जानेवारी 24 रोजी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण बसणार असल्याचा इशारा चे निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर व बाळूमामा देवस्थानचे प्रशासक यांना देण्यात आले असल्याची माहिती भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.