अखेर राधानगरीकराच्यां लढ्याला यश प्रादेशिक वन विभाग नरमले.
अखेर राधानगरीकराच्यां लढ्याला यश प्रादेशिक वन विभाग नरमले.
-----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------
राधानगरी परिसर वनहक्क संवर्धन समितीने राधानगरी मधील प्रादेशिक वनविभागाचे कार्यालय अन्यत्र हलवू नये यासाठी गेली सहामहिने निवेदन,बैठका घेऊन यासंदर्भात आवाज उठवला होता.स्थलांतरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर तीन जानेवारी रोजी कार्यालयास टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.आज उपवनसंरक्षक जी गुरूप्रसाद यांनी राधानगरी प्रादेशिक कार्यालयात धाव घेत आंदोलकांबरोबर सकारात्मक चर्चा केली.यावेळी आंदोलकांनी या कार्यालयाच्या ठिकाणी साडेसात गुंठे जागा आहे.नवीन कार्यालयाला ही जागा पुरेशी असल्याचं दाखवून दिलं.जी गुरुप्रसाद यांनी आंदोलकांसह जागेची पाहणी करत ही जागा कार्यालयासाठी पुरेशी आहे पण कर्मचारी निवासस्थानासाठी अपुरी असल्याचं सांगत जुनी इमारत पाडून याचं ठिकाणी नवीन इमारत बांधणार असल्याचं सांगत कार्यालय स्थलांतरच्या विषयाला पूर्णविराम दिला.
.यावेळी कृती समितीचे निमंत्रक प्रा, पी एस पाटील, सुहास निंबाळकर,बिद्री कारखान्याचे संचालक राजेंद्र भाटळे,रमेश पाटील बचाटे,विक्रम पालकर,रमेश राणे,विजय महाडिक,दीपक शेट्टी,संतोष पाटील,तानाजी चौगले,विश्वास राऊत,बशीर राऊत, यांच्यासह राधानगरी परिसरातील आठ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते.
बाईट -जी गुरुप्रसाद (उपवन संरक्षक कोल्हापूर)
Comments
Post a Comment