Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा गांधीचा एक गुण सुद्धा व्यक्तीला महान बनवू शकतो.

 महात्मा गांधीचा एक गुण सुद्धा व्यक्तीला महान बनवू शकतो.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी 

राजू कदम

--------------------------------------

मिरज महात्मा गांधीचे अनेक गुण गांधीच्या सत्याच्या प्रयोगांमधून दिसतात. पण सर्व गुणाचे अनुकरण करणे खूपच अशक्य आहे महात्मा गांधींनी भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला अंगभर कपडे मिळणार नाहीत तोपर्यंत मी अंगभर कपडे घालणार नाही अशा प्रकारचा विचार त्यांनी पाळला. त्यांच्या उपोषणाचं असस्त्र आजही जगभर आचरणात आणलं जात आहे. महात्मा गांधीच्या असंख्य गुण पैकी एक गुण जरी एखाद्या व्यक्तीने स्वीकारला तर ती व्यक्ती महान बनू शकते असे विचार डॉ रवींद्र फडके यांनी व्यक्त केले. ते स्कायलर्क सीबीएसई इंग्लिश स्कूलच्या गांधी पुण्यतिथी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षांनी प्राचार्य संध्या बारटक्के होत्या .

फडके पुढे म्हणाले की व्यसनापासून दूर राहण्याचा विचार पाचवीत असताना स्वीकारला व पुढे आयुष्यभर व्यसनापासून दूर राहिलो व शाळेपासून १०० मीटरच्या आत तंबाखू सदृश्य पदार्थाच्या विक्रीस मनाई करणारा नियम बनवण्यात पुढाकार घेऊन शकलो त्याचे मनस्वी समाधान वाढते आभार व्यवस्थापक डीएन माने मॅडम यांनी मानले ..

Post a Comment

0 Comments