पारंपारिक पोशाख आपले व्यक्तिमत्व उठावदार बनवतो.प्रभारी प्राचार्य डॉक्टर वसंत ढेरे.
पारंपारिक पोशाख आपले व्यक्तिमत्व उठावदार बनवतो.प्रभारी प्राचार्य डॉक्टर वसंत ढेरे.
----------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------------
आजकाल प्रत्येक शैक्षणिक संकुलात पारंपरिक पोशाख दिन साजरा केला जातो त्याचा उद्देश आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी हा आहे पारंपरिक पोशाख आपले व्यक्तिमत्व उठावदार बनवतो असे मत राधानगरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर वसंत ढेरे यांनी राधानगरी महाविद्यालय सांस्कृतिक विभागाच्या वतीने पारंपारिक वेशभूषा दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी बोलताना व्यक्त केले
या कार्यक्रमांतर्गत मराठी भाषा संवर्धन 15 वडा निमित्त मराठी विभागाच्या वतीने अक्षरगंध या भितीपत्रकाचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉक्टर वसंत ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले
त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता चारोळ्या हास्यविनोद व प्रसिद्ध साहित्यकाच्या माहितीपटाचे लेखन करण्यात आले होते
या पारंपरिक वेशभूषा कार्यक्रमा त विद्यार्थ्यांनी करा ओके गीते रेकॉर्ड डान्स पारंपारिक लोकगीते व हिंदीमराठी गीतांचे सादरीकरण करण्यात आले
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे ग्रंथपाल के एम कुंभार प्राध्यापक पीए मोकाशी प्राध्यापक एस आर सावंत प्राध्यापक डॉक्टर एकनाथ पाटील प्राध्यापक संग्राम सिंह पाटील प्राध्यापक भास्कर प्राध्यापक आ ये शा पटेल प्राध्यापक स्नेहल डवर प्राध्यापक सागर पार्टी प्राध्यापक डॉक्टर विश्वास पाटील प्राध्यापक कृष्णा एकल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राध्यापक बी के पाटील यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक वर्षा गुरव यांनी व आभार प्राध्यापक ए एम कांबळे त्यांनी मानले
Comments
Post a Comment