Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शाहू महाराज सुधारणावादी होते. - मा.प्रा. रमेश डुबल.

 शाहू महाराज सुधारणावादी होते. - मा.प्रा. रमेश डुबल.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 वाई प्रतिनिधी

कमलेश ढेकणे

---------------------------------

दि. ९: शाहू महाराजांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा ठसा दाखवला. त्यांच्या कार्यातून महाराष्ट्र घडला. शाहू महाराज हे सुधारणावादी राजे होते. असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या वाई केंद्राचे संचालक मा.रमेश डुबल यांनी केले.

येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मौजे शेंदुरजणे येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात ते लोकराजा राजर्षी शाहू महाराज जीवन व कार्य या विषयावर प्रबोधन पर व्याख्यानाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते श्री. संजय जाधव हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी एन. एस. एस. चे सल्लागार प्रा. डॉ. सुनील सावंत, सरपंच रेखा जगताप, सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय जगताप, मुख्याध्यापक संजय कुंभार, रामदास सूर्यवंशी तसेच प्रकल्प अधिकारी डॉ संग्राम थोरात व डॉ. अंबादास सकट यांची प्रमुख उपस्थिती होती.

मा. डुबल म्हणाले, शाहू महाराज शैक्षणिक व दलित चळवळीचे उद्गाते होते. त्यांनी धनदांडग्यांचे प्राबल्य मोडीच काढून शिवछत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून, राज्य कारभार केला. इंग्रजांच्या जोखडातून आपल्याला स्वराज्य मिळणार आहे हे ओळखून त्यांनी समाज सुदृढ करण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले यांना त्यांनी गुरुस्थानी मानले. राजा मधला माणूस आणि माणसांमधील राजा पाहायचा असेल तर शाहू महाराजांचे कडे पाहता येते. शाहू महाराजांनी वेठबिगारी नष्ट केली. रोजगार हमी चालू केली व गोरगरिबांसाठी वतने चालू केली.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात मा. संजय जाधव म्हणाले, शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली हे वास्तव समाजापुढे यायला पाहिजे. शाहू फुले आंबेडकर हा विचार आपण नव्या पिढीला जर सांगितलं नाही तर तो त्यांना समजणार नाही. बहुजन समाजाच्या उद्धारासाठी महनीय व्यक्तींनी केलेले कार्य नवतरुणांसमोर यायला हवे.

सिध्दी गायकवाड हिने प्रास्ताविक केले. शिवानी चराटे हिने स्वागत केले. प्रीती पिसाळ हिने पाहुण्यांची ओळख करून दिली. साक्षी कांबळे हिने सूत्रसंचालन केले. पूनम भोसले हिने आभार मानले. भूमिका धनावडे कार्यक्रमाचे हिने संयोजन केले.

कार्यक्रमास सुमंत सावंत, सुमती कांबळे, डॉ. प्रेमा यादव, शेंदुरजणे तील ग्रामस्थ व एन.एस.एसचे स्वयंसेवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments