हातकणंगले येथे ट्रक मिस्त्रीचा धारदार शस्त्राने वार करून भीषण खून .
हातकणंगले येथे ट्रक मिस्त्रीचा धारदार शस्त्राने वार करून भीषण खून .
-----------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
हातकणंगले प्रतिनिधी
-----------------------------------
हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले इंचलकंजी रोडवरील कोरोची माळावर मुख्य रस्त्यावरच एक अनोळखी व्यक्ती रात्री बाराच्या दरम्यान हातकणंगले पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकास मृत अवस्थेत आढळून आली. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. मृत व्यक्ती इचलकरंजी इथली असून त्याचे नाव भरत पांडुरंग येसाळ वय 36 असे असून घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.
हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी येथील मानस हॉटेलच्या पिछाडीस असणाऱ्या रेणुका झोपडपट्टीमध्ये भरत पांडुरंग येसाळ हे कुटुंबासह राहत होते. ते ट्रकचे मिस्त्री असून त्यांचा इचलकरंजीतील भगतसिंग बागेजवळ गॅरेज आहे. शनिवारी रात्री बारा वाजता ट्रक बंद पडला असून रीपेअर साठी यावे असा त्यांच्या मोबाईलवर फोन आल्याने भरत आपल्या मोटरसायकल वरून हातकणंगलेच्या दिशेने गेले होते. दरम्यान हातकणंगले पोलिसांच्या गस्तीपथकाला भरत हे रस्त्यावर मृत अवस्थेत पडलेले दिसले.
. पोलिसांनी नातेवाईकांना तात्काळ बोलवून घेतले. आणि तात्काळ डॉग स्कॉड, फॉरेन्सिक टीम,समर्थ रुग्णवाहिका स्वप्निल नरुटे यांना घटनास्थळी पाचारण करून तपासाला सुरुवात केली. पहाटे चारच्या दरम्यान हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. मयत भरत येसाळे याच्या शरीरावर धारदार शस्त्राने 21 वार करून खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पीएसआय अश्विनी वायचळ, संग्राम पाटील,सुरजीत चव्हाण,पोपट भंडारे, महादेव खेडकर,सुहास गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पोलीस उप उपधीक्षक रोहिणी सोळुंके यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.
Comments
Post a Comment