Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सावित्रीच्या लेकींनी नायगावातून क्रांतिज्योत आणून सावित्रीबाईंना केले अभिवादन.

 सावित्रीच्या लेकींनी नायगावातून क्रांतिज्योत आणून सावित्रीबाईंना केले अभिवादन.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे

--------------------------------------

किसन वीर मधील एन.एस. एसचा उपक्रम

वाई: दि. ३ जानेवारी 


सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे

ओैचित्य साधून येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी नायगाव ते वाई क्रांतिज्योत आणून सावित्रीबाईं फुले यांना अभिवादन केले. 

३ जानेवारी हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा जयंतीसोहळा प्रत्येकजण वेगवेगळ्या पध्दतीने साजरा करीत असतो. किसन वीर च्या एन.एस.एस. विभागाने १९३ वा जयंती सोहळा साजरा करताना महाविद्यालयाची परंपरा अबाधित ठेवून नायगाव या सावित्रीबाईंच्या जन्मगावातून वाईपर्यंत क्रांतिज्योत आणण्याचे ठरविले. त्यासाठी महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांचे खंबीर पाठबळ मिळाले. प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात व डॉ. अंबादास सकट यांनी त्याचे नेटके नियोजन केले.

समाजसुधारणेच्या कार्यात संपूर्ण आयुष्य समर्पण करणा-या सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण देण्यासाठी अंगावर दगड-गोटे झेलले याची जाणीव आजच्या एन.एस.एस. स्वयंसेवकांनाही असल्याने क्रांतिज्योत धावत आणण्यास सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांचे शोषण, अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि स्त्री शिक्षणासाठी केलेला संघर्ष त्यांच्यासाठी प्रेरणादायी असल्याचा मानस सर्व सहभागी स्वयंसेवकांनी बोलून दाखविला व नायगाव ते वाई क्रांतिज्योत आणताना मुलांच्या बरोबरीने मुलींनीही ज्योत घेऊन आपण सावित्रीच्या लेकी कुठेही कमी नसल्याचे सिद्ध केले. 

क्रांतिज्योत महाविद्यालयात येताच प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, एन. एस. एस. चे सल्लागार अनुक्रमे प्रा. डॉ. सुनील सावंत व डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी जोरदार स्वागत केले. डॉ. मंजूषा इंगवले व सर्व महिला प्राध्यापकांनी क्रांतिज्योत महाविद्यालय परिसरात फिरवली व सुशोभित रांगोळी काढून महाविद्यालयाच्या दर्शनी भागात ज्योत ठेवली. या प्रसंगी प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 क्रांतिज्योत आणण्यासाठी कनिष्ठ लिपिक जितेंद्र चव्हाण तसेच स्वयंसेवक व स्वयंसेविकांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments