Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा इंटरनॅशनल स्कूल मध्ये धक्कादायक प्रकार विद्यार्थिनीने उचलला टोकाचे पाऊल उपचारदरम्यान मृत्यू.

 जिल्हा इंटरनॅशनल स्कूल मध्ये धक्कादायक प्रकार विद्यार्थिनीने उचलला टोकाचे पाऊल उपचारदरम्यान मृत्यू.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कुपवाड मिरज प्रतिनिधी

 राजू कदम 

--------------------------------------

कुपवाड शहराजवळील बामनोली गाव मध्ये असणाऱ्या जिल्हा इंटरनॅशनल स्कूल आणि जुनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती

मंगळवारी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर 5 वाजता घरी जाण्यासाठी ती बाहेर आली साक्षीने आपल्या शाळेच्या स्कूल बस मध्ये बॅग ठेवले.


त्याचवेळी तिचे पालक हे शाळेमध्ये आले होते ते कॅम्पस मध्ये हजर होते. यावेळी आपली स्कूल बॅग बस मध्ये ठेवून साक्षी पुन्हा शाळेच्या दिशेने पळाली. दुसऱ्या मजल्यावर जात अंदाजे चार 40 ते 45 फुटाच्या अंतरावरून तिने उडी घेतली या घटनेत साक्षीला गंभीर दुखापत झाली.


घटनेनंतर शाळा प्रशासन अधिकारी आणि पालकांनी तिला एका खाजगी दवाखान्यात उपचाराला नेले व उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला.


दरम्यान साक्षीने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अस्पष्ट आहे.


घटनेचे अधिक तपास पोलीस करत आहेत

Post a Comment

0 Comments