Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

संजय साबळे यांच्या नवोपक्रमाची राज्य स्तरावर निवड.

 संजय साबळे यांच्या नवोपक्रमाची राज्य स्तरावर निवड.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

चंदगड प्रतिनिधी

आशिष पाटील 

--------------------------------

चंदगड  :- शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्य स्तरीय नाविण्यपूर्ण नवोपक्रमासाठी जिल्हा  शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर ( डायट )

यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत 

दि न्यू इंग्लिश स्कूल येथील उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांनी जिल्हयात द्वितीय क्रमांक पटकावला . त्यांनी मुलांची अध्ययन क्षमता वाढीसाठी ' खेळ खेळू प्रश्नोत्तराचा , मेळ घालू अभ्यासाचा ' हा नाविण्यपूर्ण नवोपक्रम सादर केला . त्याच्या या नवोपक्रमाची राज्य स्तरावर निवड झाली आहे . या नवोपक्रमासाठी त्यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ . एकनाथ आंबोकर , डायटचे प्राचार्य डॉ. आय . सी .शेख , डॉ. भोई , प्रा. सरीता कुदळे , गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार , प्राचार्य एन.डी. देवळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments