Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुरगुडचा स्वप्निल रणवरे 'समाज गौरव' पुरस्काराने सन्मानित.

 मुरगुडचा स्वप्निल रणवरे 'समाज गौरव' पुरस्काराने सन्मानित.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड  प्रतिनीधी

जोतीराम कुंभार

-------------------------------    

अवयवप्रत्यारोपणाने पुनर्जन्म लाभलेल्या स्वप्निलने केले अवयवदानाबाबत जागृतीचे काम 

         अवयवप्रत्यारोपणामुळे जीवदान मिळालेल्या येथील स्वप्नील शिवाजी रणवरे या युवकाने अवयवदान जागृती बाबत गेली ४ वर्षे केलेल्या योगदानाची नोंद घेत माणुसकी मल्टिपर्पज फाऊंडेशने  "माणुसकी भूषण समाजगौरव पुरस्कार 2023" ने सन्मानित केले आहे. 

      अत्यंत सामान्य कुटुंबातील स्वप्निलला ४ वर्षांपूर्वी गंभीर आजाराला सामोरे जाताना  सुदैवाने अवयवदानातून दुसऱ्याचे हृदय लाभले आणि स्वप्निलला अक्षरशः पुनर्जन्माचे भाग्य लागले. त्यानंतर स्वप्निलने या संघर्षमय अनुभवाचा इतरांना मार्गदर्शक म्हणून उपयोग करायचा निर्णय घेतला. यातूनच त्यांने अवयव दानासाठी आसुसलेल्यांना सर्व प्रकारची मदत व सहकार्य करण्याची प्रतिज्ञा घेतली. आणि अनोख्या अशा सामाजिक कार्याला अक्षरशः वाहून घेतले.       

       महाराष्ट्र- कर्नाटकातून प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदतीचे मार्ग व सल्ल्यासाठी भांबावलेले रुग्णांचे नातलग व रुग्ण स्वप्निलकडे येतात. अवयव प्रत्यारोपणाची गरज असणाऱ्या रूग्णांना शासकीय योजना, सामाजीक संस्था इ. मार्गाने आर्थिक मदत गोळा करून देणे, योग्य हॉस्पिटल व तेथील प्रत्यारोपण क्षेत्राची माहिती समजाऊन देणे व त्यांच्या कुटुंबाला मानसिक व आर्थिक दृष्ट्या आधार देणे याकामी  आजपर्यंत १२ गरजू रूग्णांना त्याने मदतीतून पुनर्जन्म मिळवून दिला आहे. 

       मृत्यूपश्चात देह पुरून अथवा जाळून टाकण्यापेक्षा मेंदू मृत झालेल्या शरीरातील हृदय, किडनी, फुफ्फुस, डोळे, यकृत, बोन मॅरो आदी एकूण ९ अवयव दान करता येतात. कित्येक अवयव निकामी होऊन समाजात अनेक लोकांचे प्राण जात आहेत. अवयवत्यांना नव्याने जीवन मिळते. समाजात अजूनही अवयव दान प्रत्यारोपण प्रक्रियेविषयी पूर्णत: माहीती नाही. जी वेळ आपल्यावर आली ती, समाजातील कोणावरही येऊ नये. म्हणून स्वप्निलने या कार्यास वाहून घेतले. 

          मलकापुर जि. बुलढाणा येथे पुरस्कार स्विकारण्यास तो जाऊ शकला नाही. पण संस्थेने हा पुरस्कार स्पीड पोस्टाने पाठवून स्वप्निलच्या पाठीवर  प्रेरणादायी थाप दिली आहे. 

      ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

          "मरावे परी अवयव रुपी जगावे"

     ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,  

        पुरस्कार स्वीकारल्यानंतर स्वप्निलने दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. या पुरस्काराने पुढील कार्यास प्रेरणा व नवी उर्जा  मिळाली. कुटुंब, मित्र परिवार, मला जीवनदान देणारे डॉ. दिक्षित व अवयवदात्यांना हा पुरस्कार आपण अर्पित करत असल्याची कृतज्ञ प्रतिक्रीया देत अवयव दान करून सर्वानी "मरावे परी अवयव रुपी जगावे" असा मौलिक सल्ला दिला आहे.

Post a Comment

0 Comments