दोन वर्ष तडीपार असलेला आरोपी आबिद मुजावर यास कराड शहर डी.बी पथकाने केले अटक.

 दोन वर्ष तडीपार असलेला आरोपी आबिद मुजावर यास कराड शहर डी.बी पथकाने केले अटक.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कराड प्रतिनिधी

वैभव शिंदे 

---‐--‐-------------------------

      मा. पोलीस अधिक्षक समीर शेख सातारा, मा. अपर पोलीस अधिक्षक आंचल दलाल सातारा, विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय विभाग कराड अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन पाटील कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेने दिनांक १९/०१/२०२४ रोजी रात्री कराड शहरातील हद्दपार आरोपीच्या आवळल्या मुसक्या.

      कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार आबीद आलम मुजावर रा.मंगळवार पेठ कराड ता. कराड जि. सातारा व त्याचा एक साथीदार यांनी कराड शहर पोलिसांनी ०२ वर्षासाठी हद्दपार केले आहे. सदर आरोपी सातारा तसेच सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यात प्रवेश नसताना देखील आबिद आलम मुजावर हा कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील हायवे लगत असलेले कोल्हापूर नाका येथे छुप्या स्वरूपात वावरत असल्याची बातमी कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांना मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील हे तात्काळ डी.बी पथकासह कोल्हापूर नाका या ठिकाणी दाखल होऊन तडीपार आरोपी नामे आबीद आलम मुजावर यास सापळा रचून ताब्यात घेतले.

       सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक समीर शेख सातारा, पोलीस अधीक्षक आंचल दलाल सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन पाटील कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सफौ देसाई, सफौ देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, पोलीस नाईक कुलदीप कोळी, महेश शिंदे, आनंदा जाधव, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.