गगनबावड्यात शोभायात्रेतून 'जय श्रीराम चा' गजर व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गावोगावी विविध उपक्रमांचे आयोजन.
गगनबावड्यात शोभायात्रेतून 'जय श्रीराम चा' गजर व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गावोगावी विविध उपक्रमांचे आयोजन.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------------
'जय श्री राम' नावाचा अखंड जयजयकार, ढोल ताशांचा गजर ,वारकऱ्यांचे राम नामाचे भजन, प्रभू श्रीराम यांची आकर्षक मूर्ती ,भगव्या टोप्या परिधान केलेल्या राम भक्तांचा उत्साह अशा भक्तिमय वातावरणात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा धामणी खोऱ्यात संपन्न झाला.
व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे संताजी बाबा घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गगनबावडा तालुक्यात प्रत्येक गावात राम मंदिराची प्रतिकृतीचे दर्शन घडवण्यात आले.
आयोध्येत बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात श्री राम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली .या पार्श्वभूमीवर देशभर उत्साहाचे वातावरण होते. अनेक गावामध्ये विविध उपक्रमांनी हा लोकोत्सव साजरा करण्यात आला.
धार्मिक विधी, होम हवन, राम जन्मभूमी कलश पूजन,स्रोत पठण, महाआरती, प्रसाद वाटप भजनाचा कार्यक्रम , श्रीरामांच्या प्रतिकृती पताका शोभयात्रांनी गगनबावडा तालुका राममय झाला आहे .
Comments
Post a Comment