लँड माफीयांना मदत करणाऱ्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या वर फौजदारी दाखल करावी. भिमराव गोंधळी .
लँड माफीयांना मदत करणाऱ्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या वर फौजदारी दाखल करावी. भिमराव गोंधळी .
कोल्हापूर :- अमेरिकन मिशन जमिनीची बेकायदा खरेदी विक्री, त्याप्रमाणे सातबारा पत्रकार नोंदी, आणि त्यावर बांधकाम करणाऱ्या सर्वांवर फौजदारी दाखल करून कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे करवीर तालुका अध्यक्ष भिमराव गोंधळी यांनी केली
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूस असणाऱ्या आणि अमेरिकन मिशन बंगला म्हणून नोंद असलेली सुमारे 57 एकर जमीन ही मूळ शासनाची आहे. या जमिनीवरील ब सत्ता प्रकार कमी करून क सत्ता प्रकार लावून सदर जमिनीची खरेदी- विक्री, हस्तांतर, नोंदणी आणि बांधकामे इत्यादी करून जमीन हडप करणाऱ्या लँड माफियावर आणि या लँड माफियाना मदत करणाऱ्या मुख्यतः नगर भूमापन, महसूल खात्यातील अधिकारी, नगरपालिकेतील अधिकारी आणि दस्त नोंदणी अधिकारी यांचेवर फौजदारी संहितेखाली कडक कारवाई करावी आणि त्यांना शासकीय जमीन खरेदी विक्री करण्याच्या गंभीर कटात सामील झाल्याबद्दल नोकरीतून तात्काळनिलंबित करण्यात यावे.
या लँड माफिया आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या वर कडक कारवाई जर झाली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन उभा करण्यात येईल,याची गंभीर दखल घ्यावी.अशा आशयाचे निवेदन
डॉ.संपत खिलारी
उप जिल्हा अधिकारी महसूल यांना देण्यात आले त्यावेळी
मा.भिमराव गोंधळी वंचित बहुजन आघाडी करवीर तालुका अध्यक्ष,
प्रताप ताराळ जिल्हा सचिव,विकास बाचणे जिल्हा कोषाध्यक्ष,अर्जुन गोंधळी करवीर महासचिव, अर्जुन कांबळे सचिव, संतोष कांबळे शाखा अध्यक्ष, तानाजी काळे जिल्हा संघटक, अशोक आळतेकर कोषाध्यक्ष, बाबासाहेब धनवडे, राजेंद्र धनवडे, उपस्थित होते
Comments
Post a Comment