कायदा व सुव्यवस्थेचे शिरोळ नगरीत वाजले की बारा....शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे गावठी दारू बनावट विदेशी दारू यांचे थैमान सामान्य नागरिक हतबल.

 कायदा व सुव्यवस्थेचे शिरोळ नगरीत वाजले की बारा....शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे गावठी दारू बनावट विदेशी दारू यांचे थैमान सामान्य नागरिक हतबल.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

जयसिंगपूर प्रतिनिधी

नामदेव भोसले 

-----------------------------

अवैध धंदे आता 'सिस्टिमचा भाग या गोंडस नावाखाली उघडपणे सुरू आहेत. काहीही करा; पण आमचे बघा' या ब्रीदशी जोडून या परिसरात अवैध धंदे प्रशासकीय मान्यता मिळाल्यासारखे जोरदार सुरू आहेत. अवैध धंदे बीट आमलदारानी वेळीच थांबवले नाहीत, तर गावागावांत या अवैध धंद्यांचे पीक जोमाने वाढेल, यात तिळमात्र शंका नाही. अवैध व्यवसायांतून मिळणारा पैसा पाहून आता काहीजण यात नव्याने थेटपणे उतरत आहेत.

नवीन व्यावसायिकांची भर या धंद्यात पडल्याने पोलिसांसाठी 'नाकापेक्षा मोती जड'अशी अवस्था होणार आहे. चर्चा या गावातून सुरू आहे. शासनाने बेकायदेशीर ठरवलेले मटका, जुगार, अवैध दारू जणू कायदेशीर मान्यता असल्यासारखे उघडपणे सुरू आहेत. 'एन्ट्री'च्या नावाखाली काहीजण गब्बर होत आहेत. वाढत्या अवैध व्यावसायिकांमुळे 'एन्ट्री' वाल्यांची अवस्था आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन अशी झाली आहे. 'एंट्री' दिली की गावात काहीही केले तरी चालते, या तत्त्वाने अवैध व्यावसायिक रस्त्याकडेलाच थाटात व्यवसाय उभे करत आहेत. याबाबत काही गावांनी यापूर्वी अवैध व्यवसायांना गावांतून हद्दपार केले होते. मात्र आता तेही जोमाने सुरू आहे.विविध प्रकारच्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट होऊन चोऱ्या, दरोड्यांच्या घटना वाढल्याचा जाहीर आरोप ग्रामस्थ करु लागल्याने शिरोळ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत विविध प्रकारच्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. अवैध तसेच बनावट दारु विक्रीचे मोठे रॅकेट या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असताना त्याची माहिती पोलिसांना नसेल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. जयसिंगपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचा खऱ्या अर्थाने भांडाफोड झाल्याचा आरोप होऊ लागला आहे. मटका, पत्त्याचे क्लब, जुगाराचे अड्डे गल्लोगल्ली दिसू लागल्याकडे लोकांचे लक्षवेधू लागले आहेत. यामुळे व्यसनी, जुगारी लोकांचा सर्वत्र संचार वाढला आहे. शौक पूर्ण करण्यासाठी भुरट्या चोऱ्यांचा मार्ग काहींनी स्वीकारल्याचे दिसत आहे. राजरोसपणे सुरु असलेल्या या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यास असमर्थ ठरलेले जयसिंगपूर पोलीस चोऱ्यामाऱ्यांचा तपास लावण्यातही अपयशी ठरल्याचा ग्रामस्थांनी स्पष्ट आरोप केला आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.