जिल्हा स्तरीय समूहगीत स्पर्धेत विद्या मंदीर कोनोली तर्फ असंडोली(ता. राधानगरी )शाळा प्रथम क्रमांक.
जिल्हा स्तरीय समूहगीत स्पर्धेत विद्या मंदीर कोनोली तर्फ असंडोली(ता. राधानगरी )शाळा प्रथम क्रमांक..
----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
----------------------------
कोल्हापूर जिल्हा परिषद अंर्तगत जिल्हा स्तरीय सांस्कृतिक स्पर्धा शाहू स्मारक कोल्हापूर याठिकाणी पार पडल्या. यामध्ये विद्या मंदीर कोनोली तर्फ असंडोली शाळेच्या विद्यार्थ्यांनींनी समूहगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. एकनाथ आंबोवकर साहेब यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन यशस्वी विद्यार्थ्यांनी व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
सर्व विद्यार्थ्यांनींना राधानगरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. बी एम. कासार साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री जांगणुरे साहेब, मा. श्री कडगावकर साहेब, केंद्र प्रमुख मा. श्री लोटेकर सर, मुख्याध्यापक मा. श्री डी. एम. पोवार सर यांचे प्रेरणा तसेच संगीत विशारद श्री. सुहास पाटील सर, तबला वादक श्री विक्रम परीट सर, अध्यापक श्री आनंदा गडकर सर, श्री. डी एस पाटील सर, श्री, आनंदा पाटील सर,सौ.नंदा जाधव मॅडम, कु. पुजा पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती चे आजी माजी अध्यक्ष,उपाध्यक्ष सर्व सदस्य,सर्व पालक, सर्व संस्था चे पदाधिकारी, सर्व तरुण मंडळ आणि सर्व ग्रामस्थांचे प्रोत्साहन लाभले आहे. कोनोली तर्फ असंडोली शाळेने हे ऐतिहासिक यश मिळवले बद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment