त्या 'दोषीवर कारवाई न केल्यास शिवसेना आंदोलन निवेदनाद्वारे इशारा.
त्या 'दोषीवर कारवाई न केल्यास शिवसेना आंदोलन निवेदनाद्वारे इशारा.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
गारगोटी प्रतिनिधी
----------------------------------
गारगोटी : मौनी विद्यापीठातील माजी संचालकाने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असून, संबंधित संचालकावर विश्वस्तांनी फौजदारी गुन्हा दाखल न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आंदोलन करणार असल्याचे निवेदन भुदरगड पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांना दिले आहे.
निवेदनातील आशय असा आहे की माजी संचालकाने अधिकाराचा गैरवापर करून विद्यापीठात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे. तालुक्याची अस्मिता असलेल्या आणि शिक्षणाची पांढरी असलेल्या शैक्षणिक ज्ञानमंदिरात नोकरी केलेल्या
प्राचार्यांनी भ्रष्टाचार केला आहे. सदरचे प्रकरन प्रसासनाकडून दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करा, अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, माजी तालुकाप्रमुख बचाराम गुरव, थॉमस डिसोजा, विल्सन बारदेस्कर, वसंत कांबळे, अशोक दाभोळे, कृष्णात खतकर, संदीप पाटील, सुनील गुरव, दत्तात्रय हेवाळे, मनोज नलवडे, यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment