Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

किसन वीर मध्ये राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम संपन्न.

 किसन वीर मध्ये राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम संपन्न.

-----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे 

-----------------------------------------

नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा - डॉ. सुरभी भोसले.

वाई दि. २७: आपला भारत लोकशाही तत्त्वावर चालणारा देश आहे. आपल्या संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. विद्यार्थ्यांनो तुम्ही सर्वजण मतदार आहात, तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे प्रतिपादन डॉ. सुरभी भोसले यांनी केले.

शिवाजी विद्यापीठ व महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना मतदार साक्षरता समिती, मराठी विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित संवाद मतदारांशी या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या, याच कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने नवमतदारांशी संवाद साधला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले, नायब तहसीलदार आशा दुधे, प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, एन.एस. एस चे सल्लागार अनुक्रमे प्रा. (डॉ.) सुनील सावंत डॉ. चंद्रकांत कांबळे व उपप्राचार्य प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे प्रा. (डॉ.) विनोद वीर, कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात डॉ. अंबादास सकट, राजेंद्र जायकर सतीश तावरे यांची उपस्थिती होती.

डॉ. भोसले म्हणाल्या, समाज माध्यमांमध्ये मशगुल असणारी तरुणाई मतदान प्रक्रियेकडे निष्क्रियपणे पाहताना दिसते. सुशिक्षित लोकही मतदानादिवशी सुट्टी साजरी करतात, हे लोकशाहीसाठी घातक आहे निवडणूक ओळखपत्र हे आपले शस्त्र आहे त्याचा योग्य वापर करावा. कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे असे त्यांनी आवाहन केले. 

नायब तहसीलदार मा. अशा दुधे म्हणाल्या. नवमतदारांनी सजग राहून आपले नाव मतदार यादीत आले आहे का? हे काळजीपूर्वक पाहावे. आपले एक मत लोकशाही बळकट करण्याचे काम करते. १८ वर्षे पूर्ण झालेल्या जास्तीत जास्त तरुणांनी निवडणूक ओळखपत्र काढून घ्यावे. प्रत्येक निवडणुकीत मतदान करून आपले कर्तव्य बजावावे असा संदेश त्यांनी नवमतदारांना दिला. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. संग्राम थोरात यांनी मतदारांसाठीच्या प्रतिज्ञेचे वाचन केले, तसेच मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध, भित्तीपत्रक, रांगोळी या स्पर्धांची माहिती दिली. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रांताधिकारी कार्यालयाकडून प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती दिली. दुर्वा हेळकर, भूमिका धनावडे, अर्चिता महांगडे, अंकिता रत्नपारखे, कीर्ती पिसाळ व ओंकार बोबडे या नवमतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. 

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जितेंद्र चव्हाण यांनी परिश्रम घेतले. डॉ. संग्राम थोरात यांनी प्रास्तावित केले. गणेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले व प्राचार्य गुरुनाथ फगरे यांनी आभार मानले. सामूहिक राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास एनएसएस स्वयंसेवक, नवमतदार तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments