भर जहागीर येथे राममंदिर प्रतिष्ठापना निमित्त दहा हजार भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
भर जहागीर येथे राममंदिर प्रतिष्ठापना निमित्त दहा हजार भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.
(महाप्रसादा साठी गरकळ कुटुंबीयांचा पुढाकार )
-----------------------------------------------------------------
फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र
रंजीत सिंह ठाकुर
------------------------------------------------------------------
रिसोड . प्रतिनिधी रणजीत ठाकूर..ता.22 जानेवारी 2024= आयोध्या नगरी मध्ये श्रीराम प्रभुं मुर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आसल्याने भर जहागीर येथे मागील सात दिवसापासुन भक्तीमय वातावरण निर्माण झालेले होते.नागरिकांनी एक प्रकारे दिपावली साजरी केली होती.येथिल प्राचीन महादेव मंदिर परीसरामध्ये गजानन दत्तराव गरकळ यांनी सुमारे दहा हजार भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
भर जहागीर या गावाला पौराणिक महत्व लाभलेले आहे,भावार्थ रामायणा मध्ये भर जहागीर या गावाचा उल्लेख "भारद्वाज" आसा आलेला आहे.श्रीराम प्रभु,सिता,लक्ष्मण वणवासा मध्ये निघाले आसतां त्यांच्या पदस्पर्शाने भर जहागीर ची भुमी पावण झाल्याचा उल्लेख ग्रंथा मध्ये आहे.त्यामुळे मागील सात दिवसापासुन येथिल ग्रामस्थांनी दिवे लावुन,रांगोळी,पताकाच्या माध्यमातून हा उत्सव साजरा केला होता.आज.ता.22 जानेवारी रोजी भारद्वाज महादेव मंदिर परीसरा मध्ये सुमारे 15 क्विंटल अन्नधान्याचा महाप्रसाद गजानन दत्तराव गरकळ यांच्या वतीने ठेवण्यात आला होता.यावेळी गावातील सर्व धर्मीय ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment