Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील शेतकऱ्याचा झाडावरून पडून मृत्यू.

 राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील शेतकऱ्याचा झाडावरून पडून मृत्यू.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

------------------------------

राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील गोरखनाथ शामराव पाटील (वय 61) या शेतकऱ्याचा झाडावरून पडल्यानं जागीच मृत्यू झाला.

गोरखनाथ पाटील हे शनिवारी सकाळी बांधावरील झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी वरचा मळा नावाच्या शेतात पत्नीसह गेले होते.दुपारी दीडच्या सुमारास फांदी तोडताना उंच झाडावरून तोल जाऊन ते खाली कोसळले. त्यांच्या पत्नीने आरडा ओरड करताच आसपास असलेल्या शेतकऱ्यांनी गोरखनाथ यांना तातडीनं कसबा तारळे इथं रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. सायंकाळी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर गुडाळ इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. 

गोरखनाथ हे सैन्य दलातील जवान उत्तम पाटील यांचे वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा,एक मुलगी, सून- नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments