उंचगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा.

 उंचगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

--------------------------------------

  शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस व सकल मराठा समाज यांच्या वतीने उंचगाव मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून चौकात साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

   यावेळी मोटर सायकल रॅली काढून घोषणा देत व गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. 

    कावजी कदम, राजू यादव, प्रकाश महाडिक, विक्रम चौगुले, दिपक मुदगडे यांनी आपली मनोगते व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण साठी आपली जिद्द सोडली नाही. सनदशीर मार्गाच्या आंदोलनाचे सातत्य ठेवत आपल्या मागणीवर ठाम राहिले त्यामुळे मराठा समाजाने त्यांच्यावरती प्रचंड विश्वास ठेवला व मुंबईच्या दिशेने लाखो मराठा तरुण, वयोवृद्ध व महिलांनी कूच केली. एवढा मोठा जनसमुदाय एकत्र आल्याने सरकारला त्याची दखल घेणे भाग पडले व आरक्षण दिले. अनेक वेळा केलेली आंदोलने ही आश्वासने देऊन मोडीत काढल्याचे पहिले अनुभव समाज्यासमोर होते. पण आता मराठा समाज ऐकणार नाही म्हणून सरकारला मराठा समाज्या समोर झुकायला लागले व आरक्षण देण्यात आले. याबद्दल सकल मराठा समाजाने उंचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.*

   *यावेळी उंचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, कावजी कदम,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करवीर तालुका प्रमुख राजू यादव,महेश जाधव,अनिल यादव, अशोक निगडे,सुनील पोवार, बाळासाहेब मनाडे,दिनकर पोवार, विक्रम चौगुले,दिपक रेडेकर, विराग करी, बाळासो यादव,अमर जाधव,सचिन चौगुले, शामराव यादव, दत्ता यादव, मधुकर चव्हाण, सतीश मुसळे, राहुल मोळे, संजय निगडे,सूरज पाटील, विनायक हावळ, दादू यादव, सूरज इंगवले अवि मोळे, संजय चौगुले, बाजीराव मनाडे,संभाजी यादव, गुरुदेव माने, अरविंद शिंदे,नारायण मनाडे, श्रीधर कदम, दीपक पाटील, अजित माने,सतीश वळकुंजे, संदीप वळकुंजे, सतीश भोसले, अजित चव्हाण, बंडा पाटील, योगेश लोहार,शरद लांडगे तसेच सकल मराठाचे अभिजित कदम, विश्वास यादव, प्रकाश महाडिक, रोहित शिंदे, सुनील यवलूजे, विजय वरुटे, धनंजय भोसले, दिपक मुदगडे, विजय शिंदे, अजित पाटील, संदीप मनाडे, योगेश खाडे, दर्शन माने, उमेश कदम, उदय पाटील, योगेश चव्हाण आदी उपस्थित होते.*

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.