Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

एक्सप्रेस रेल्वे गाडया गांधीनगर व रुकडी रेल्वे स्टेशनवर थांबवा अन्यथा रेलरोको आंदोलन करू- करवीर तालुका शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे).

 एक्सप्रेस रेल्वे गाडया गांधीनगर व रुकडी रेल्वे स्टेशनवर थांबवा अन्यथा रेलरोको आंदोलन करू- करवीर तालुका शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे).

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

-----------------------------

   बाजारपेठेत येणाऱ्या व सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पंधरा हजारावर आहे. मिरज, हातकणंगले, निमशिरगांव, माणगांव, जयसिंगपूर, परिसरातील कर्मचारी बाजारपेठेत सेवा बजावतात. त्यांना एसटीतून प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. जर गिरजहून येणाऱ्या सर्व एक्सप्रेस गांधीनगर रेल्वे स्टेशनवर थांबल्या तर या कर्मचाऱ्यांना अल्पदरात गांधीनगर बाजारपेठेत येता येईल. याशिवाय मिरज जंक्शन वरुन परराज्यातून येणारा व्यापारी वर्ग व ग्राहकांची सोय होईल, गेल्या कित्येक महिन्यापासून एक्सप्रेस रेल्वे गाड्या थांबत नसल्याने गांधीनगर बाजारपेठेमध्ये मंदीचे सावट दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील या अग्रगण्य बाजारपेठेला आधार देण्याची केंद्रसरकारची जबाबदारी आहे. केंद्रीय रेल्वे खात्याने गांधीनगर व रुकडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या थांबविल्यातर गांधीनगर बाजारपेठेला पुन्हा उर्जीत अवस्था येईल. व वारंवार विविध पक्ष संघटनांनी रेल्वेकडे तक्रारी, निवेदने, आंदोलनाचे इशारे व आंदोलने करुनही रेल्वे प्रशासन या प्रश्नाकडे गांर्भीयाने पाहत नाही. त्यामुळे कागगार, व्यापारी वर्ग व ग्राहकांमध्ये रेल्वेबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने या प्रश्नाची गंभीर दखल घेतली असून गांधीनगर बाजारपेठेसाठी तेथील कामगार वर्गासाठी आणि व्यापारी वर्गासाठी प्रसंगी रेल्वेरोको आंदोलन करण्यात येईल. तत्पूर्वी याबाबत सारासार गांर्भीयाने विचार करुन गांधीनगर रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेससह सर्व रेल्वे गाड्या थांबवाव्यात तसे न झाल्यास रेल्वेरोको आंदोलन करण्यात येईल.*

 *या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने मा.आर. के. मेहता, रेल्वे स्टेशन प्रबंधक छत्रपति शाहू महाराज टमर्निल, कोल्हापूर यांना देण्यात आले.*

    *तसेच या मागणीचे निवेदन मा. केंद्रीय रेल्वे मंत्रीसो, भारत सरकार व मा. इनचार्ज ऑफिसर, मिरज रेल्वे जंक्शन यांना ई मेल द्वारे देण्यात आले.*

    *यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, गांधीनगर रिटेल व्यापारी अध्यक्ष दिलीप कुकरेजा, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, बाळासाहेब नलवडे, सुनील पारपाणी, किशोर कामरा, जितू चावला, बाबुराव पाटील, आबा जाधव, भगवान पंजवाणी, भगवानदास मनचुडीया, महेश माखिजा आदी उपस्थित होते*

Post a Comment

0 Comments